ETV Bharat / state

नाशिकमध्ये पावसाच्या दमदार पुनरागमनामुळे दुबार पेरणीचे संकट टळणार

जिल्ह्यात आठवडाभर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. तीन-चार दिवस वातावरणात उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण होते. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

author img

By

Published : Jul 20, 2019, 6:04 PM IST

पाऊस

नाशिक - शहरासह सटाणा, येवला, कळवण, चांदवड, दिंडोरी, पेठ, सुरगाणा आणि निफाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसानंतर शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली असून हा पाऊस जिल्ह्यातील खरीप पिकाला जीवदान देणारा ठरेल यामुळे शेतकऱ्यांसमोरील दुबार पेरणीचे संकट टळणार आहे.

कपिल भास्कर

नाशिक जिल्ह्यात आठवडाभर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. तीन-चार दिवस वातावरणात उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र, आता पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला.

कळवण शहर व परिसरात पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. पेरणी झाली नाही अशा ठिकाणी पेरणी करण्याची संधी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे. पावसाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण मध्ये गेल्या महिन्यापासून पाऊस नव्हता, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता.

अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसायला सुरुवात झाली होती, त्यामुळे तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाऊस पडावा यासाठी नागरिक होमहवन, पूजा, जागर, सामुहिक नमाज पठण असे उपक्रम राबवून देवाला पाऊस पडावा म्हणून साकडे घालत होते. मात्र, काल रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Intro:नाशिक मध्ये पावसाची दमदार हजेरी,दुबार पेरणीचे संकट टळणार....

Body:नाशिक शहरा सह सटाणा,येवला,कळवण,चांदवड,दिंडोरी,पेठ,सुरगाणा आणि निफाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी दिल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

काल रात्रीच्या पावसा नंतर नाशिक मध्ये आज दुपार पावसाने हजेरी लावली असून ,हा पाऊस जिल्ह्यातील खरीप पिकाला जीवदान देणारा असून ह्या मुळे शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळणार आहे,नाशिक जिल्ह्यात आठवडा भर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या तसेच तीन चार दिवस वावरणात उकाडा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले होते, मात्र आता पावसाने दमदार हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकरी वर्गात देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..

कळवण शहर व परिसरात पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे,पेरणी शिल्लक असलेल्या काही ठिकाणी पेरणी करण्याची संधी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे,पावसाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कळवण मध्ये गेल्या महिन्यापासून पाऊस नव्हता, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता ,अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसायला सुरुवात झाली होती,त्यामुळे तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, पाऊस पडावा ह्या साठी नागरिक होमहवन, पूजा,जागर, सामूहिक नमाज पठण असे उपक्रम राबवून देवाला पाऊस पडावा म्हणून साकडे घालत होते,मात्र काल रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे...
कपिल भास्कर स्टँड अप प्रतिनिधी नाशिक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.