ETV Bharat / state

समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ 'टिक-टॉक'वर नको; नाशिक पोलिसांची व्यवस्थापनाला नोटीस

author img

By

Published : Apr 4, 2020, 10:46 AM IST

लॉकडाऊनच्या काळात काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करणे तसेच अफवा पसरवण्यासाठी 'टिक टॉक' व्हिडिओ अ‌ॅपचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. टिक टॉक कंपनीच्या भारतातील व्यवस्थापन प्रमुखाला नोटीस बजावण्यात आल्याचे डॉ. आरती सिंग यांनी सांगितले.

टिक टॉक
टिक टॉक

नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉगडाउन केला आहे. अशात काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करणे तसेच अफवा पसरवण्यासाठी 'टिक टॉक' व्हिडिओ अ‌ॅपचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेत अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक जिल्हा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी 6 जणांवर कारवाई करत त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती नाशिकच्या पोलीस अधीक्षिका डॉ. आरती सिंग यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. तसेच या प्रकरणात टिक टॉक कंपनीच्या भारतातील व्यवस्थापन प्रमुखाला नोटीस बजावण्यात आल्याचे डॉ. आरती सिंग यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशात लॉगडाऊन जाहीर केला आहे. मात्र, अशात काही महाभाग अफवा पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा सर्रास वापर करताना दिसून येत आहेत. आता याबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेत मालेगाव येथून अशाच एका विकृत व्यक्तीला अटक केली आहे. त्याने टिकटॉकच्या माध्यमातून किळसवाणा व्हिडिओ अपलोड केला होता. सायबर पोलिसांनी तपास करत त्या विकृत्याला अटक केली आहे. अशाचप्रकारे नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या 6 जणांवर कारवाई केल्याचे सिंग यांनी सांगितले.

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व अफवा पसरवणाऱ्या पोस्ट व्हॉटसअ‌ॅपवर पुढे पाठवणाऱ्यांसोबत ग्रुप अ‌ॅडमिनवर देखील कारवाई करणार असल्याचे देखील पोलीस अधीक्षका डॉ. आरती सिंग यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.