नाशिक : नाशिक जिल्ह्यात झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे रोजगाराच्या नव्या संधी डोकावताना दिसतात. चांगल्या रस्त्यांमुळे हा विकासाचा वेग अजुन मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ड्रायपोर्ट हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट असून द्राक्ष, कांदे आणि ऑटोमोबाईल्सच्या क्षेत्रातील निर्यात थेट येथून व्हावी आणि येथेही थेट आयात वाढावी. नाशिकला आयात-निर्यातीच्या क्षेत्रात देशातील अग्रगण्य ठिकाण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari statment) यांनी केले आहे.
विकास करण्याचा मानस : काल इगतपुरी येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण भारत सरकार यांचेमार्फत आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या 226 की.मी. लांबीच्या 1830 कोटींच्या प्रकल्पांच्या कोनशिला अनावरण व लोकार्पण समारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. मी आपल्याला विश्वास देवू इच्छितो की, रोड, रेल्वे आणि ॲव्हिएशन यांचा उपयोग करून आयात-निर्यातीचे प्रमुख केंद्र नाशिकला बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ज्यावेळी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेची निर्मिती केली गेली. त्याचवेळी मुंबई-नाशिक या हायवेचाही त्याच धर्तीवर विकास करण्याचा मानस होता, परंतु तांत्रिक अडचणींमुळे तो त्यावेळी होवू शकला नसला तरी समृद्धी महामार्ग नाशिकमधून गेल्याने तो मानस आज पूर्ण होताना दिसतो याचा आनंद निश्चितच आहे. येणाऱ्या काळात या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्यात येईल, असा विश्वासही यावेळी केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला (Nashik leading place in import and export) आहे.
वेळ आणि इंधनाचीही बचत : आज विशेषत: नांदगाव ते मनमाड या भागात 253 कोटी रूपयांची कामे झाली आहेत. या कामांमुळे सुरत-नागपूर हा महामार्ग धुळे-औरंगाबाद-सोलापूर हा साक्री-शिर्डी यांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या महामार्गामुळे जळगाव-नाशिकमधील संपर्क सुधारणार असून त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे. त्याचबरोबर मनमाड येथील पाणेवाडी येथील बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या डेपोंना आसपासच्या शहराला जोडणे सहज शक्य झाले आहे. नाशिकला अपघातमुक्त शहर करण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे असल्याची अपेक्षाही यावेळी गडकरी यांनी व्यक्त (Nitin Gadkari statment) केली.
आयात निर्यात अधिक सुलभ : एकूण 7 कामांचे आज भूमिपूजन होत आहे, त्यांची लांबी 205 किलोमीटर इतकी आहे. त्यासाठी 1577 कोटी रूपयांची ही कामे आहेत. धुळे लोकसभा मतदार संघातीलही महत्वाच्या कामांचा त्यात समावेश आहे. गोंदे ते पिंप्री सदो सेक्शनचे सहा पदरीकरण हे आपण आज करतो आहोत. समृद्धी महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर वडपेपर्यंत वाहतुक मोठ्या प्रमाणात असणार आहे. या भागात खर्डी एमआयडीसीत लॉजेस्टिक पार्क मोठ्या प्रमाणात आहेत. वडपे या ठिकाणी समृद्धी महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग व मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग एकत्र येतात, त्यामुळे येणाऱ्या काळात वडपे हे महत्वाचे जंक्शन होणार आहे. जे.एन.पी.टी. ला त्याचा थेट फायदा होण्याबरोबरच येथील आयात निर्यात अधिक सुलभ व जलदगतीने होणार आहे. येथून आपण दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात सहज आणि जलदगतीने पोहोचणार आहोत, त्यामुळे नाशिकचे महत्व अधिकच वाढणार आहे.
निधीसह मंजुरी : या महामार्गासोबतच महत्वाचा महामार्ग सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस असून या महामार्गामुळे फार मोठी क्रांती या भागात होणार आहे. त्याची किंमत जवळपास 80 हजार कोटी इतकी असून त्यातील नाशिक जिल्ह्यात 10 हजार कोटींच्या रस्त्याचे काम होणार आहे. 1290 किलोमीटरचा हा मार्ग 10 तासात चेन्नईमध्ये आपल्याला पोहोचवणार आहे. त्यामुळे नाशिकहून दक्षिणेत जाण्यासाठी उत्तम सोय होणार आहे. हा महामार्ग नाशिक-अहमदनगर-बीड-उस्मानाबाद- सोलापूर अशा पाच जिल्ह्यातून जाणार आहे. महाराष्ट्रात याची लांबी 482 किलोमीटर इतकी आहे. नाशिक जिल्ह्यात तो 122 किलोमीटर इतका असणार आहे. त्यातील बहुतांश भूभाग हा आदिवासी बहुल क्षेत्रातून जाणार आहे, त्यामुळे या रस्त्याच्या आजूबाजूला उद्योग, लॉजेस्टिक पार्कसह विविध योजनांच्या वाढीस वाव मिळणार आहे. यावेळी नाशिकरोड ते द्वारका चौक यामार्गावर 6 कि.मी. च्या डबल डेकर उड्डाणपुलाच्या कामाला 1600 कोटींच्या निधीसह मंजुरी देण्यात आली असल्याचेही गडकरी (Nitin Gadkari) यांनी यावेळी जाहिर केले.
या प्रकल्पांचे झाले कोनशिला अनावरण : गोंदे ते पिंपरी - सदो फाटा (रा.म.क्र.३) सहापदरीकरण. (लांबी : २० कि.मी., किंमत : ८६६ कोटी)सटाणा ते मंगरुळ (रा.म.क्र.७५२जी) खंडाचे रुंदीकरण व दर्जोन्नतीकरण. (लांबी : ३७ कि.मी., किंमत : ४२९ कोटी)१० वा मैल, जऊळके-दिंडोरी व आंबेबहुला (रा.म.क्र.३) येथे भुयारीमार्ग व उड्डाणपूल (लांबी : ४.३ कि.मी., किंमत : २११ कोटी) खंबाळे ते पहिने व शतगाव ते अंबोली (रा.म.क्र.१६० अ) मजबुतीकरण. (लांबी : ३० कि.मी., किंमत : ३८ कोटी) गुरेवाडी फाटा ते सिन्नर (रा.म.क्र.६०) खंडाचे मजबुतीकरण. (लांबी : ९ कि.मी., किंमत : १४ कोटी)घोटी-सिन्नर (रा.म.क्र.१६०अ) मार्गावरील रस्ता सुरक्षा सुधार कार्य. (लांबी : ५३.५०० कि.मी., किंमत : ११ कोटी) पिंपळगाव - नाशिक - गोंदे (रा.म.क्र. ३) एलईडी पथदिवे लावणे. (लांबी : ५१ कि.मी., किंमत : ७.५ कोटी)या प्रकल्पाचे झाले लोकार्पण.नांदगाव ते मनमाड (रा.म.क्र.७५३जे) खंडाचे रुंदीकरण व दर्जोन्नतीकरण. (लांबी : २१ कि.मी., किंमत : २५३ कोटी)
प्रकल्पांचे फायदे : ओझर विमानतळास सहज व सुरक्षित कनेक्टिव्हिटी, कृषी उत्पादने मोठ्या बाजारपेठेत (मुंबई) पाठवणे सहज शक्य, ग्रामीण भागातून शहराकडे जलद व सुलभ प्रवास, आर्थिक विकास व नवीन रोजगाराच्या संधी, इंधन व वेळेची बचत, प्रदुषणाला आळासमृध्दी द्रुतगती मार्गाशी (मुंबई-नागपूर) सुलभ व सुरक्षित कनेक्टिव्हिटी, गोंदे औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध, आधुनिक रस्त्यांची बांधणी व त्याद्वारे जागतिक दर्जाचा संपर्क हे आहेत.