ETV Bharat / state

मुंबईच्या धर्तीवर काॅल सेंटर सुरू करा; शरद पवारांच्या नाशिक प्रशासनाला सूचना - शरद पवार नाशिक दौरा

शरद पवार शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी खासगी डॉक्टर उपचारासाठी पुढे येत नसतील तर ही दुर्दैवाची बाब आहे. डॉक्टर पुढे येत नसतील तर टोकाचे पाऊले उचलून प्रसंगी कायदेशीर कारवाई करावी. तीन महिन्यात राज्य सरकरला दीड लाख कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक नियोजन करून कामकाज करावे लागणार आहे. येथील कारखानदारी सुरू करण्यास प्राधान्य द्यावे लागणार असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शरद पवार नोशिक दौरा
शरद पवार नोशिक दौरा
author img

By

Published : Jul 25, 2020, 10:54 AM IST

नाशिक - मुंईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ तास कॉल सेंटर सुरु करण्यात आली. या ठिकाणी तपासणी संख्याही वाढविण्यात आली. त्यामुळे मुंबईत आज दिलासादायक चित्र निर्माण होत आहे. धारावी सारख्या ठिकाणी प्रशासनाला यश मिळाले आहे. त्याच धर्तीवर कोरोना नियंत्रणासाठी नाशिकमध्ये काॅल सेंटर उभारावे, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत ते बोलत होते.

पवार म्हणाले, लेगावमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असताना आपण लक्ष ठेऊन होतो. त्यासाठी अनेकांशी संपर्क केला. प्रशासनाने याठिकाणी विशेष योगदान दिले. तसेच नागरिकांनी सहकार्य केले, त्यामुळे कोरोनावर लवकर नियंत्रण मिळविता आले. महानगरपालिका क्षेत्रात पुढील काळात लवकरच बेडची कमतरता होऊ शकते. त्यामुळे बेडची संख्या वाढविण्याबाबत काम करावे. यासाठी निधीची आवश्यकता असेल तर राज्याच्या अर्थमंत्र्यांशी बोलून निधी उपलब्ध करून दिला जाईल. खासगी डॉक्टर उपचारासाठी पुढे येत नसतील तर ही दुर्दैवाची बाब आहे. डॉक्टर पुढे येत नसतील तर टोकाचे पाऊले उचलून प्रसंगी कायदेशीर कारवाई करावी. तीन महिन्यात राज्य सरकरला दीड लाख कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक नियोजन करून कामकाज करावे लागणार आहे. येथील कारखानदारी सुरू करण्यास प्राधान्य द्यावे लागणार असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

रिक्त पदाच्या जागा त्वरीत भरणार, खासगी रुग्णालयाची बिले आधी ऑडिटरकडे -टोपे

नागरिकांना माहिती मिळण्यासाठी कॉल सेंटर तातडीने तयार करून आरोग्य सुविधा सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येतील. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १७ हजार जागा रिक्त असून मेगा भरतीत आलेल्या अर्जाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर लवकरच त्या जागा भरण्यात येतील. स्वॅब काळजीपूर्वक घेण्यात येऊन त्याची तपासणी करण्यात यावी. फिव्हर क्लिनिकची संख्या वाढविण्यात यावी. ट्रँकिंग ट्रेसिंग १०० टक्क्यांपर्यंत न्यावी. इन्स्टिट्यूशनल कॉरंटाईनची संख्या वाढविण्यात यावी. जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांची सक्तीने यादी जाहीर करावी. कमीत कमी ७ दिवस काम करणे बंधनकारक करण्यात यावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करावी. खासगी रुग्णालयातील बिलाची शासकीय ऑडिटरच्या माध्यमातून तपासणी केल्यानंतर बिल अदा करण्यात यावी. महात्मा फुले योजनेची पूर्ण क्षमतेने अमलबाजवणी करण्यात यावी गरीब रुग्णांना औषधे प्राधान्याने देण्यात यावी अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.

महापालिकेने स्वता:चे रुग्णालय उभारावे - भुजबळ

नाशिक शहर व परिसरात आता रुग्ण वाढत आहे रुग्ण वाढत आहे. रुग्ण दगावणार नाही याची काळजी घ्यावी. नाशिक मध्ये खूपच चांगली परिस्थिती आहे, असे नाही. मात्र इतर ठिकाणच्या तुलनेत नाशिक अजूनही नियंत्रणात आहे. शहरात जनतेने स्वनियोजन करत लॉकडाऊन केले. राज्यातही इतर शहरात लॉकडाऊन केले आहे. त्याचा अभ्यास करूनच निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊन बाबत घाईघाईने पाऊलं उचलून चालणार नाही. त्यामुळे मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते. त्यामुळे सर्व समन्वयातून अभ्यास करून निर्णय घ्यावा लागणार आहे. महापालिकेने कोरोनासाठी स्वता:चे रुग्णालय उभारावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या.

या वेळी बैठकीला उपस्थित...
विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ, कृषिमंत्री दादा भुसे, खा.गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी खा.समीर भुजबळ, आ. सुधीर तांबे, माणिकराव कोकाटे, किशोर दराडे, नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज आहिरे, मालेगावच्या महापौर ताहीरा शेख, माजी आमदार पंकज भुजबळ, जयवंतराव जाधव, जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार, कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे,तसेच राज्य टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.सुधाकर शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे,महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, मुख्याधिकारी लीना बनसोडनाशिक परिक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील,पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.