ETV Bharat / state

नाशिक : स्पुटनिक लसीच्या पाच लाख डोसची मागणी करणार - आयुक्‍त - नाशिक लसीकरण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचे डोस सद्य:स्थितीत नाशिक शहरातील नागरिकांना देण्यात येत आहेत. या दोन्ही लसींचे दोन डोस द्यावे लागणार आहेत. यावर पर्याय म्हणून रशियानिर्मित स्पुटनिक या लसीचा एकच डोस द्यावा लागणार असल्याने महापालिका पाच लाख डोसची मागणी नोंदविणार असल्याची माहिती मनपा आयुक्‍त कैलास जाधव यांनी दिली.

nasik demand Sputnik vaccine  five lakh doses

author img

By

Published : May 25, 2021, 5:22 PM IST

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचे डोस सद्य:स्थितीत नाशिक शहरातील नागरिकांना देण्यात येत आहेत. या दोन्ही लसींचे दोन डोस द्यावे लागणार आहेत. यावर पर्याय म्हणून रशियानिर्मित स्पुटनिक या लसीचा एकच डोस द्यावा लागणार असल्याने महापालिका पाच लाख डोसची मागणी नोंदविणार असल्याची माहिती मनपा आयुक्‍त कैलास जाधव यांनी दिली.

आयुक्‍त जाधव यांनी सांगितले की शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मागणी होत आहे. सद्य:स्थितीत मर्यादित लस मिळत असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी स्पुटनिक लसीसंदर्भात माहिती घेतली असता ही लस उपलब्ध होऊ शकते, अशा निर्णयापर्यंत आपण आलो आहोत. त्यानुसार संबंधितांनी बृहन्मुंबई महापालिका ही लस खरेदी करणार असून, त्याबरोबरच नाशिक महापालिकेनेही मागणी केल्यास लस उपलब्ध होऊ शकेल, असे कळविण्यात आले आहे. याबाबत लवकरच पाच लाख लसींची नोंदणी करण्यात येणार आहे, याशिवाय या लसीचा एकच डोस उपयोगी पडणार असल्याने त्याचा चांगलाच फायदा होणार असून, ही लस उपलब्ध होताच वेगाने लसीकरण पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्‍त जाधव म्हणाले.

अपोलो हॉस्पिटल आणि डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज यांनी रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीबाबत कार्यक्रम हाती घेतला आहे. भारतात दाखल झालेली ही लस मोठ्या प्रमाणात भारतीयांना दिली जाणार आहे. भारतात सद्य:स्थितीत कोविशिल्ड व कोवॅक्सिन या लसी दिल्या जातात. त्याचबरोबर आता स्पुटनिक ही लसही दिली जाणार आहे. रशियाची स्पुटनिक व्ही ही लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. याशिवाय लसीचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने जारी केल्यानुसार तूर्तास ही लस प्रायोगिक तत्त्वावर हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथे सुरू केली आहे. त्यानंतर ही लसीकरण मोहीम मुंबई, दिल्‍ली, बेंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुणे येथे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या लसीसाठी आता नाशिक महापालिकेनेही मागणी नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्‍त कैलास जाधव यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.