नाशिक - दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ‘ओमिक्रॉन’(Omicron Variant) आढळला आहे. या देशात आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेतलेले दोन खेळाडू नाशिक शहरात परतले आहे. त्यामुळे चिंता वाढली असून या दोन खेळाडूंचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहे. ( Two People Swab Negative over Omicron Variant Nashik )
स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह -
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ही स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र, एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ही स्पर्धा नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत नाशिकमधून दोन खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. यातील एकाने ही स्पर्धा जिंकली. आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेतलेले दोन खेळाडू नाशिक शहरात चार दिवसापूर्वी परतले आहेत. त्यांचा स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या दोन खेळाडूंना क्वारंटाईन केले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांचे ट्रेसिंग करुन त्यांचीही टेस्टिंग केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.
हेही वाचा - Omicron Variant : राज्यात तूर्त लॉकडाऊन नाही, शाळा 1 डिसेंबरलाच उघडणार - राजेश टोपे
नाशकातील शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरनंतर -
याशिवाय आस्थापनांच्या बाबत कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. कोरोना नियमांचा भंग केल्यास कठोर कारवाईचा इशारा पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिला. तसेच नाशिक शहरातील शाळा सुरू करण्याबाबतचा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे चित्र पाहून निर्णय १० डिसेंबरनंतर घेतला जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.