ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्यांचे नाशिक येथे दहन

उन्नाव प्रकरणातील आरोपीला भाजप सरकार पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप नाशिक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर केला आहे. सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्यांचे नाशिक येथे दहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्यांचे नाशिक येथे दहन
author img

By

Published : Aug 1, 2019, 8:22 PM IST

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्यांचे नाशिक युवक काँग्रेस व युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दहन केले. उन्नाव बलात्कार प्रकरणी आरोप असलेले कुलदीप सिंह सेंगर यांना मोदी सरकार पाठीशी घालत आहे, असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. 'मोदी सरकार हाय हाय', 'योगी सरकार हाय हाय', अशा सरकार विरोधी घोषणा, देत पुतळ्यांना जोडे मारले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्यांचे नाशिक येथे दहन
उन्नाव प्रकरणातील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याऐवजी हे सरकार आपल्याच सदस्याला वाचवण्यात मग्न आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कडक कारवाई योगी सरकारने केलेली नाही. हेच सरकार 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नारा देत आहे. तर दुसरीकडे मुलींवर होणाऱ्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यालाच आता भाजप सरकारने 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या मोहिमेचा दूत नेमा, अशी मागणीही नाशिक जिल्हा युवक काँग्रेसने केली. नाशिकमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, युवक प्रदेश सचिव कल्याणी रांगोळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. महिला सुरक्षेबद्दल खोटा कळवळा दाखवत आहे. आपल्याच नेत्यांकडून महिलांवर होणारा अत्याचार मूग गिळून गप्प बघत बसणाऱ्या भाजप सरकारचा युवती काँग्रेसने बांगड्या भेट देऊन निषेध व्यक्त केला.

Intro:उन्नाव बलात्कार प्रकरणी आरोप असलेले कुलदीप सिंह सेंगर यांना मोदी सरकार पाठीशी घालत असल्यावरून आज काँग्रेस कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करत..नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या काल्पनिक पुतळ्याचे नाशिक युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दहन केले..तसेच मोदी सरकार हाय हाय,योगी सरकार हाय हाय अशा सरकार विरोधी घोषणा देत पुतळ्याला जोडे मारलेBody:..या प्रकरणातील उत्तर प्रदेशच्या पीडित मुलीला न्याय मिळवून देण्या ऐवजी हे सरकार आपल्याच सदस्याला वाचवण्यात मग्न आहे..त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कडक कारवाई योगी सरकारने केलेली नाही..एकीकडे हेच सरकार बेटी बचाव, बेटी पढावचा नारा देत असताना दुसरीकडे मुलींवर होणाऱ्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालत आहे..त्यामुळे या सरकारचा निषेध काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय..आंदोलना दरम्यान युवती काँग्रेसच्या वतीने स्मृती इरानींना बांगड्या भेट देत..त्याच बांगड्या स्मृती इरानींनी मोदींना घालाव्या असा संताप देखील कार्यकर्त्यानाकडून व्यक्त केला गेलाय...

बाईट : १) कल्याणी रांगोळे.
(महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव )
2) स्वप्निल पाटील
(नाशिक शहर जिल्हा अध्यक्ष)Conclusion:भाजपा आमदार कुलदीपसिंह सेंगर यालाच आता भाजपा सरकार ने बेटी बचाओ बेटी पाढाओ या मोहिमेचा दूत नेमा, अशी मागणी करत आज नाशिक जिल्हा युवक काँग्रेस चे वतीने नाशिक मध्ये जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, युवक प्रदेश सचिव कल्याणी रांगोळे ह्यांच्या नेतृत्वा खाली निदर्शने करण्यात आली. महिला सुरक्षेबद्दल खोटा कळवळा दाखवून आपल्याच नेत्यांकडून महिलांवर होणारा अत्याचार मूग गिळून गप्प बघत बसणाऱ्या भाजपा सरकारचा या युवती कॉंग्रेस कडून बांगड्या भेट देऊन निषेध व्यक्त केलाय..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.