नाशिक - जानेवारी 2020 ते जुलै 2020 या सात महिन्यात वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम राबवत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 1 लाख 15 हजार 720 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली. या कारवाईमधून 3 कोटी 21लाख 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांविरोधात मोहीम उघडत, ऑनलाइन दंड वसुली प्रक्रियेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली आहे. यात 1 लाख 15 हजार 720 वाहनचालकांना 3 कोटी 21 लाख 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी 85 लाख 10 हजार रुपयांची वसुली करण्यात आली असून 23 लाख 59 हजार रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करणे बाकी आहे. ई चलान सुविधा मिळाल्याने वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांन विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. वाहन चालवताना परवाना नसणे, दुचाकीवरून ट्रीपल सीट प्रवास करणे, हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर न करणे, सिग्नल नियमाचे पालन न करणे, अशा वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
कारवाईचा तपशील -
महिना | केसेस | वसूल दंड | प्रलंबित दंड |
जानेवारी | 18 हजार 795 | 28 लाख 41 हजार 500 | 44 लाख 83 हजार 200 |
फेब्रुवारी | 20 हजार 78 | 19 लाख 7 हजार 700 | 47लाख 68 हजार 100 |
मार्च | 17 हजार 37 | 15 लाख 13 हजार 500 | 48 लाख 63 हजार 300 |
एप्रिल | 5 हजार 23 | 3 लाख 39 हजार | 13 लाख 32 हजार 100 |
मे | 4 हजार 117 | 1लाख 57 हजार 200 | 9 लाख 26 हजार 100 |
जून | 17 हजार 240 | 5 लाख 67 हजार 300 | 52 लाख 65 हजार 700 |
जुलै | 32 हजार 830 | 11 लाख 83 हजार 800 | 1 कोटी 4 लाख 62 हजार 500 |
एकूण | 1 लाख 15 हजार 720 | 85 लाख 10 हजार | 3 कोटी 21लाख 1 हजार |