नाशिक - नाशिक महापालिकेच्या राजीव गांधी भवनामध्ये रात्री तिसऱ्या मजल्यावर दारूच्या पार्ट्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेचे कर्मचारीच अशा प्रकारच्या पार्ट्या करत असल्याची चर्चा आहे. चक्क महापालिकेच्या इमारतीत अशा प्रकारच्या दारू पार्ट्या होत असल्याने खळबळ उडाली आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या राउंडमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. यात तिसऱ्या मजल्यावर देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, खाण्याचे पदार्थ, तंबाखू, बिडी, सिगारेटचे पाकिट्स आढळून आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त खाडे यांनी दिला आहे.
महापौरांकडून चौकशीचे आदेश
शहरात कोरोनाची अतिशय काठीण परिस्थिती असताना अशा पार्ट्या होतातच कशा, असा सवाल महापौर सतीश कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे पालिका मुख्यालयात कोरोनामुळे बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आल्याने, या पार्ट्या मनपाच्या कर्मचाऱ्यांनीच केल्याचा आंदाज आहे. दरम्यान या पार्टीमध्ये कोणाचा समावेश आहे, त्याचा शोध घेऊन कारवाई करावी असे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले आहेत.
हेही वाचा - 'पीएम-किसान' योजनेचा आठवा टप्पा; आज मोदींच्या हस्ते होणार १९ हजार कोटी रुपयांचे हस्तांतर