नाशिक - राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निफाड, पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा व दिंडोरी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक (Nagar Panchayat Election 2021) २१ डिसेंबरला होणार आहे. या दिवशी सदर नगरपंचायतीच्या (Voting for Nagar Panchayat In Nashik District 2021) क्षेत्रातील मतदानासाठी स्थानिक क्षेत्रात पूर्ण दिवस सुट्टी जाहीर केली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केले आहेत. नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत.
कारखाने, दुकाने यांना मतदानाच्या दिवशी सुट्टी लागू रहाणार
या आदेशानुसार उद्योग, उर्जा व कामगार विभागात येणाऱ्या आस्थापना, कारखाने, दुकाने यांना मतदानाच्या दिवशी सुट्टी लागू रहाणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील निफाड, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, कळवण व देवळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी इत्यादींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात येणार आहे. या आदेशान्वये राज्य, केंद्र शासन व खाजगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना त्याचप्रमाणे माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स व रिटेलर्स यांचा समावेश असणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - शिवसैनिकावर खुनी हल्ला प्रकरणी चौघे ताब्यात, सतीश सावंतांनी हल्ला घडविल्याचा निलेश राणेंचा आरोप