नाशिक - मुंबई उच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकार आणि मराठा समाजाच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे. याच निर्णयाचे नाशिककरांनी स्वागत केले आहे. यानिमित्त नाशिकच्या पंचवटी परिसरात मराठा समाजाच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सुरुवातीला मराठा समाजाच्या आत्महत्या केलेल्या शिलेदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत जल्लोष केला गेला. समाज बांधवांना मिठाई देत फटाके फोडून या निर्णयाचे नाशिकमध्ये स्वागत करण्यात आले. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाकरता वेळोवेळी विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला अशांचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.