नाशिक - कोरोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झालेले आहे. अशा परिस्थिती मंगल कार्यालय आणि लॉन्स त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकही चिंतेत आहेत. एकीकडे काम बंद असताना दुसरीकडे बुकिंग देखील रद्द होत आहे. यामुळे लॉन्स व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
लॉकडाऊन काळात सर्वच क्षेत्रावर मंदीच सावट आहे. मंगल कार्यालय आणि लॉन्स व्यावसायिकांची देखील लॉकडाऊनमुळे चांगलीच अडचण झाली आहे. लॉन्स आणि मंगल कार्यालय व्यवसायावर अवलंबून असलेल्या 200 ते 300 जणांचा दैनंदिन रोजगार गेल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हेही वाचा - नगरमध्ये २४ परदेशी तबलिगींना अटक; पर्यटन व्हिसाचा गैरवापर करत असल्याचे उघड
दरम्यान, लॉकडाऊन पूर्वी झालेले बुकिंग रद्द होत असताना नवीन बुकिंग देखील येत नाही आणि आधी बुकिंग केलेल्या ग्राहकांनी रक्कम परत मिळावी, अशी मागणी करत आहेत. मात्र, लॉन्स मालकांनी रक्कम परत न देता पुढची तारीख आम्ही देऊ, असे सांगण्यात येत आहे. तर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या क्षेत्रातल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.