ETV Bharat / state

कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोर प्रयत्न करावेत - छगन भुजबळ - छगन भुजबळ न्यूज

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे प्रयत्न करावेत, अशी सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.

NASHIK
नाशिक
author img

By

Published : May 3, 2021, 9:42 PM IST

येवला - लॉकडाऊन झाल्यापासून शहरी भागातील रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही रुग्णवाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी रुग्णसंख्या कमी कशी होईल, त्यादृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात यावे, अशा सूचना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज (3 मे) येवला विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी भुजबळ बोलत होते.

कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोर प्रयत्न करावेत - छगन भुजबळ

ऑक्सिजनचा आवश्यक साठा रुग्णालयात ठेवा
'ऑक्सिजनची कमतरता होऊ नये यासाठी ऑक्सिजनचा आवश्यक साठा रुग्णालयात ठेवण्यात यावा. डॉक्टर तसेच इतर कर्मचारी मनुष्यबळाची कमतरता असलेल्या केंद्रांवर तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून द्या. बंद असलेले व्हेंटिलेटर तातडीने सुरू करा. ड्युरा आणि जम्बो सिलेंडरची आवश्यकता असल्यास आपली मागणी कळवून ते उपलब्ध करून घेण्यात यावेत. शहरात प्रत्येक वॉर्डात नगरसेवकांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन तपासणी मोहीमेस सहकार्य करावे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सर्वांनी आता आपापली जबाबदारी लक्षात घेऊन अथक प्रयत्न करावेत', असे भुजबळांनी यावेळी म्हटले.

तालुक्यातील खरीप हंगामाचा आढावा

खरीप पिकांच्या नियोजनाबाबत कृषी विभागाकडून केलेल्या नियोजनाचा भुजबळांनी आढावा घेतला. यानंतर तालुक्यात खते, बियाणे यांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करा. तसेच खरीप हंगामाची तयारी पूर्ण करा, असेही निर्देश यावेळी भुजबळांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा - लसीकरणासाठी काँग्रेस कार्यकर्ते मुख्यमंत्री निधीत देणार मदत-नाना पटोले

हेही वाचा - 'सुरक्षेच्या आडून पूनावालांची हेरगिरी केली जातेय'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.