ETV Bharat / state

नाशकात भेसळयुक्त पदार्थांवर मोठी कारवाई ; सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन विभागाची 'धडक' - nashik food and drugs enforcement division

अन्न औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून 1 कोटी 48 लाख 36 हजार रुपयांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त केले आहेत. शहरातील विविध भागांत छापे टाकण्यात आले. यामध्ये अधिकाऱ्यांच्या हातात हे घबाड लागले.

nashik food and drugs department
अन्न औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून 1 कोटी 48 लाख 36 हजार रुपयांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त केले
author img

By

Published : Nov 14, 2020, 2:59 PM IST

नाशिक - अन्न औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून 1 कोटी 48 लाख 36 हजार रुपयांचे भेसळयुक्त अन्न पदार्थ जप्त केले आहेत. शहरातील विविध भागांत छापे टाकण्यात आले. यामध्ये अधिकाऱ्यांच्या हातात हे घबाड लागले.

nashik food and drugs department
नाशकात भेसळयुक्त पदार्थांवर मोठी कारवाई

सण-उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा वापर मिठाई बनवण्यात केला जातो. याच पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई करण्यात येत होती. यात शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अन्न व औषध विभागाच्या वतीने तब्बल एक कोटी 48 लाख 36 हजार रुपयांहून अधिक प्रतिबंधित अन्नपदार्थ आणि भेसळयुक्त मिठाईचा साठा जप्त करण्यात आला आहे.

nashik food and drugs department
सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासन विभागाची 'धडक'

नाशिक शहरातील विविध ठिकाणी छापे मारून ही कारवाई करण्यात आली असून यात मोठ्या प्रमाणावर अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात तफावत आढळून आलेल्या 34 दुकानांवर तर प्रतिबंधित अन्नपदार्थ बाळगल्याप्रकरणी जवळपास 83 दुकानांवर कारवाई करण्यात आली. नाशिक अन्न व औषध विभागाचे सहआयुक्त सीडी साळुंखे, सहाय्यक आयुक्त परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.