ETV Bharat / state

नाशिक जिल्हा बँक संचालकांच्या मानगुटीवर 'अंधश्रद्धे'चे भूत; बँक कब्रस्तानच्या जागेवर असल्याने स्थलांतराचा निर्णय

बँकेवर असलेली भुतबाधा उतरवण्यासाठी बँकेचे मुख्यालय पुन्हा नव्या इमारतीतून सीबीएस जवळील इमारतीत स्थलांतरित करण्याची तयारी सुरू झाली आहे. वैज्ञानिक युगात जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या संस्थेत अंधश्रद्धा पाळल्या जातात याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जिल्हा सहकारी बँक
author img

By

Published : May 8, 2019, 4:20 PM IST

नाशिक - जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकांच्या मानगुटीवर अंधश्रद्धेचे भूत बसले आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नाशिकच्या द्वारका परिसरात जिल्हा बँकेचे मुख्य कार्यालय आहे. मात्र, हे कार्यालय ज्या जागेवर उभारण्यात आले आहे तिथे आधी कब्रस्तान असल्याने बँक डबघाईला आल्याचा जावई शोध संचालक मंडळांनी लावला असून ही बँक पुन्हा पूर्वीच्या सीबीएस येथील जुन्या इमारतीत स्थलांतरीत करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

कृष्णा चांदगुडे (अनिस पदाधिकार)

बँकेवर असलेली भुतबाधा उतरवण्यासाठी बँकेचे मुख्यालय पुन्हा नव्या इमारतीतून सीबीएस जवळील इमारतीत स्थलांतरित करण्याची तयारी सुरू झाली आहे. वैज्ञानिक युगात जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या संस्थेत अंधश्रद्धा पाळल्या जातात याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जुन्या इमारतीत असलेल्या तिजोरीची पूजा करण्यात आली असून टप्याटप्याने नवीन इमारतीतील सर्व विभाग जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्याची तयारी संचालक मंडळाने केली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकेत येणे सोपे व्हावे यासाठी नाशिकच्या मध्यवर्ती भाग असलेल्या द्वारका परिसरात तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून देखणी इमारत बांधण्यात आली मात्र, आता अंधश्रद्धेपायी तब्बल पाच कोटी रुपयांवर पाणी सोडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा बँक आर्थिक संकटात सापडली आहे. जिल्हा बँकेचे जवळपास 2 हजार 700 कोटीचे कर्ज थकीत असून, कर्ज वसुली मात्र अवघी दहा टक्के झाली आहे. त्यामुळे दुष्काळात बँकेने कर्ज वसुलीचा तगादा सुरू केला आहे. या कर्जवसुलीवरून जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदार आहेर यांच्याविरोधात भाजपचेच लोकप्रतिनिधी आघाडीवर आहेत. बँकेला सतत होणारा तोटा, बरखास्तीची कारवाई, संचालकांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, जिल्ह्यातील बँकेतील तिजोऱ्यांचे लुटण्याच्या घटना याचा संदर्भ हा बँक ज्या जागेवर आहे, तेथील भूतबाधेशी जोडला जात आहे. त्यामुळे बँक स्थलांतरित करण्याचा निर्णय संचालक मंडळातर्फे घेण्यात आला आहे.

केदा आहेर आहेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष

नवीन इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर उभी असून, बँक स्थलांतरित झाल्यापासून आर्थिक तोट्यात जात असल्याची मानसिकता बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहे. या जागेवर काम करण्याची त्यांची मानसिकता नसून स्थलांतराचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे खुद्द नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदार आहेर यांनी म्हटले आहे.

नवीन इमारतीत या आधी देखील आणला होता मांत्रिक

दोन वर्षांपूर्वी जिल्हा बँकेच्या तिजोरीची लूट सुरू असताना, जिल्हा बँकेच्या एका माजी संचालकांनी धक्कादायक खुलासा केला होता. बँकेच्या इमारतीची जागा कब्रस्तानची असल्याने इमारतीची भुताटकी हटवण्यासाठी उद्घाटनाच्या आदल्या रात्रीच मांत्रिक आणून इमारतीची शांती केल्याचा दावा केला होता. मुख्य शाखाच बाधित असल्याने अन्य शाखा सुरक्षित कशा राहतील असा अजब तर्क या संचालकांनी लावल्यानंतरच तिजोरीच्या खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा बँक डबघाईला भुताटकीचा संदर्भ जोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कृष्णा चांदगुडे (अनिस पदाधिकारी)

भूत प्रेत असे काहीच नसून आज अनेक इमारती या कब्रस्तानच्या जागेवर उभ्या असून त्यात राहणारे कुटुंबदेखील सुखाने राहत आहेत. ही केवळ अंधश्रद्धा असून संचालकांशी याबाबत आम्ही चर्चा करणार असून वेळ पडल्यास आम्हाला या इमारतीत काही दिवस राहण्याची परवानगी द्या, अशी मागणीही आम्ही संचालकांकडे करणार असल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले. बँकेला मंत्रिकाची नाही तर चांगल्या अकाऊंटंटची गरज आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वैज्ञानिक विषयाला प्रोत्साहन दिले जात आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे असलेले काही संचालक मात्र अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकले असल्याचे दिसून येत असल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले आहे.

Intro:नाशिक जिल्हा बँकेच्या संचालकांच्या मानगुटीवर भूत...
बँके कब्रस्तानच्या जगावर असल्याने स्थलांतराचा निर्णय..

Body:नाशिक जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकांच्या मानगुटीवर अंधश्रद्धेचं भूत बसलंय का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे..नाशिकच्या द्वारका परिसरात जिल्हा बँकेचं मुख्य कार्यालय आहे..मात्र हे कार्यालय ज्या जगेवर उभारण्यात आलं आहे तिथे आधी कब्रस्तान असल्याने बँक डबघाईला आल्याचा जावई शोध संचालक मंडळांनी लावला असून ही बँक पुन्हा पूर्वीच्या सीबीएस येथील जुन्या इमारतीत स्थलांतरीत करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे...बँकेवर असलेली भुतबाधा उतरवण्यासाठी बँकेचे मुख्यालय पुन्हा नव्या इमारतीतून सीबीएस जवळील इमारतीत स्थलांतरित करण्याची तयारी सुरू झाली आहे, वैज्ञानिक युगात जिल्हा बँकेत सारख्या महत्त्वाच्या संस्थेत अंधश्रद्धा पाळल्या जातात याचं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे...

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जुन्या इमारतीत असलेल्या तिजोरीची पूजा करण्यात आली असून टप्याटप्याने नवीन इमारतीतील सर्व विभाग जुन्या इमारतीत स्थलांतरित करण्याची तयारी संचालक मंडळाने केले आहे ,त्यामुळे आणि तिजोरीच्या खरेदीसाठी भुताटकीचा संदर्भात वादात सापडला आहे....
जिल्हयातील शेतकऱ्यांना बँकेत येणं सोपं व्हावं यासाठी नाशिक च्या मध्यवर्ती भाग असलेल्या द्वारका परिसरात तब्बल 5 कोटी रुपये खर्च करून देखणी इमारत बांधण्यात आली मात्र आता अंधश्रद्धेपायी तब्बल पाच कोटी रुपयांवर पाणी सोडणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे...

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली नाशिक जिल्हा बँक कधी नव्हे ती इतकी आर्थिक संकटात सापडली आहे, जिल्हा बँकेचे जवळपास 2700 कोटीचे कर्ज थकीत असून, कर्ज वसुली मात्र अवघी दहा टक्के आहे, त्यामुळे दुष्काळात बँकेने कर्ज वसुलीचा तगादा सुरू केला आहे, या कर्जवसुली वरून जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या विरोधात भाजपचेच लोकप्रतिनिधींनी आघाडीवर आहे,बँकेला सतत होणारा तोटा, बरखास्तीची कारवाई ,संचालकांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप,जिल्ह्यातील बँकेतील तिजोऱ्यांचे लुटण्या घटना ह्याचा संदर्भ हा बँक ज्या जागेवर आहे,तेथील भूतबाधेशी जोडला जात आहे..आणि त्यामुळे बँक स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे...

केदा आहेर अध्यक्ष जिल्हा बँक
नवीन इमारत ही कब्रस्तानच्या जागेवर उभी असून, बँक स्थलांतरित झाल्यापासून आर्थिक तोट्यात जात असल्याची मानसिकता बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहे, या जागेवर काम करण्याची त्यांची मानसिकता नसून स्थलांतराचा प्रस्ताव विचाराधीन आहे,असं खुद्द नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी म्हटले आहे..

नवीन इमारतीच्या ह्या आधी देखील आणला होता मांत्रिक..

दोन वर्षांपूर्वी जिल्हा बँकेच्या तिजोरीची लूट सुरू असताना, जिल्हा बँकेच्या एका माजी संचालकांनी धक्कादायक खुलासा केला होता.. बँकेच्या इमारतीची जागा कब्रस्तानची असल्याने इमारतीची भुताटकी हटवण्यासाठी उद्घाटनाच्या आदल्या रात्रीच मांत्रिक आणून इमारतीची शांती केल्याचा दावा केला होता, मुख्य शाखेचे बाधित असल्याने अन्य शाखा सुरक्षित कशा राहतील असा अजब तर्क या संचालकांनी लागल्यानंतरच आणि तिजोरीच्या खरेदी करण्यात आल्या होती.. त्यामुळे आता पुन्हा बँक डबघाईल ला भुताटकीचा संदर्भ जोडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे...

कृष्णा चांदगुडे अनिस पदाधिकारी
भूत प्रेत असं काहीच नसून आज अनेक इमारती ह्या कब्रस्तानच्या जागेवर उभ्या असून त्यात राहणारे कुटुंब देखील सुखाने राहत आहे.. ही केवळ अंधश्रद्धा असून संचालकांशी याबाबत आम्ही चर्चा करणार असून वेळ पडल्यास आम्हाला या इमारतीत काही दिवस राहण्याची परवानगी द्या अशी मागणीही आम्ही संचालकांकडे करणार असल्याचं कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले,बँकेला मंत्रिकाची नाही तर चांगल्या अकाऊंटनं ची गरज आहे..एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या कडून वैज्ञानिक विषयाला प्रोत्साहन दिलं जात आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी चे असलेले काही संचालक मात्र अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकले असल्याचे दिसून येत असल्याचं कृष्णा चांदगुडे यांनी म्हटलंय...
बाईट कृष्णा चांदगुडे अनिस पदाधिकारी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.