ETV Bharat / state

दिंडोरी: सेनेला 'ओळख ना पाळख' असलेला उमेदवार अन् गटबाजी भोवली, राष्ट्रवादी ठरली वरचढ - विधानसभा निवडणुक रिझल्टस

दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून धडा घेत अत्यंत नियोजनबद्धरीत्या प्रचार यंत्रणा राबवली. आमदार नरहरी झिरवाळ यांची वैयक्तिक प्रतिमा तालुक्यावर कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय पाटील जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी यांचे तालुक्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर असलेले वर्चस्व यामुळे शिवसेनेत निवडणुकीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी तालुक्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.

दिंडोरी: सेनेला 'ओळख ना पाळख' असलेला उमेदवार, गटबाजी भोवली, राष्ट्रवादी ठरली वरचढ
author img

By

Published : Oct 26, 2019, 8:41 AM IST

Updated : Oct 26, 2019, 11:04 AM IST

नाशिक - दिंडोरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून नरहरी झिरवाळ यांचा झालेला एकतर्फी विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना-भाजप युतीच्या तालुक्यातील पदाधिकारी व नेते मंडळींच्या डोळ्यात घातलेले अंजन आहे, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत असलेली गटबाजी मोठ्या प्रमाणात मताचे रुपांतरातून भास्कर गावित यांच्या पराभवाने समोर आल्याने दिंडोरी विधानसभा मतदार संघात चर्चेचा विषय ठरला आहे. महत्वाचे म्हणजे नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या सामान्य माणसाने जनसंपर्काच्या जोरावार विजयी 'हॅट्ट्रिक' साधली आहे.

दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून धडा घेत अत्यंत नियोजनबद्धरीत्या प्रचार यंत्रणा राबवली. आमदार नरहरी झिरवाळ यांची वैयक्तिक प्रतिमा असलेल्या तालुक्यावर कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय पाटील जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांचे तालुक्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर असलेले वर्चस्व यामुळे शिवसेनेत निवडणुकीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी तालुक्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.

राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ बोलताना...

ही ठरली २०१९ निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये -

  • विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत दिंडोरी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी घेतली आहे
  • दिंडोरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी
  • शिवसेनेचे उमेदवार असलेले भास्कर गावित यांना यांच्या पेठ तालुक्यातून शिवसेनेला अत्यल्प मतांची आघाडी
  • नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येणार्‍या उमेदवार नरहरी झिरवाळ ठरले आहेत

ही आहेत शिवसेनेचा उमेदवार पडण्याची कारणे -

  • निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीवरून सुरू असलेला घोळ
  • शिवसेनेचे तालुका पदाधिकारी यांचे ग्रामीण भागातील शिवसैनिकांशी नसलेला संवाद
  • उमेदवारीवरून शिवसेनेत पडलेली गट
  • निवडणुकीच्या दिवसापर्यंत कार्यकर्त्यांना मिळालेली कमी रसद
  • उमेदवार भास्कर गावित पेठ तालुक्यातील असल्याने दिंडोरी तालुक्यातील जनतेशी नसलेली ओळख
  • सर्वाधिक मतदान असलेल्या दिंडोरी तालुक्यातील उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्याने दिंडोरी पेठचा प्रांतवाद दिंडोरी तालुक्यातील मतदारांच्या मनात तयार झाला

निवडणुका जाहीर झाल्यापासून शिवसेना पक्ष तयारीला लागला होता. त्यात सुरुवातीला शिवसेनेत भास्कर गावित व सदाशिव गावित हे दोघे उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेपूर्वी राष्ट्रवादी गेलेले माजी आमदार धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ आठ दिवसातच माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या तिकिटासाठी इच्छुक संख्या वाढली आणि त्याचे रूपांतर गटबाजी झाले.

दिंडोरी तालुक्यातील ६ जिल्हा परिषद सदस्य व पेठ तालुक्यातील २ जिल्हा परिषद सदस्य यांसह दोन्ही पंचायत समितीवर शिवसेनेची एक हाती सत्ता होती. तसेच राज्यात व केंद्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्याने त्यांना भक्कम पाठबळ होते. असे असतानाही निष्क्रिय पदाधिकारी व अखेरच्या क्षणापर्यंत असणारी गटबाजी यांचे रूपांतर भास्कर गावित यांच्या मोठ्या पराभवात झाले.

हेही वाचा - दिंडोरीमधून राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ विजयी, विजयानंतर रात्रभर कार्यकर्त्यांचा जल्लोष

हेही वाचा - शिवसेनेच्या मजबूत गडाला राष्ट्रवादीचा दे धक्का; दिलीप बनकर विजयी

Intro:दिंडोरी कराने निवडला हाकेला धावून येणारा लोकप्रतिनिधी - शामराव सोनवणे -दिंडोरी विधानसभा मतदार संघातून झालेल्या निवडणुकीतून नरहरी झिरवाळ यांचा झालेले एकतर्फी विजय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना-भाजप युतीच्या तालुक्यातील पदाधिकारी व नेतेमंडळींच्या डोळ्यात घातलेलं घसघशीत अंजन होय निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेत असलेली गटबाजी मोठ्या प्रमाणात मताचे रूपांतरातुन समोर आल्याने दिंडोरी विधानसभा मतदार संघात चर्चेचा विषय ठरला आहे नरहरी झिरवाळ सारख्या अत्यंत साध्या माणसाने जनशक्ती च्या जोरावर तिसऱ्यांदा मिळवलेला विजय म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पावतीच होय.
Body:दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या जिल्हापरिषद निवडणुकीपासून धडा घेत अत्यंत नियोजनबद्धरीत्या राबवलेली प्रचार यंत्रणा आमदार नरहरी झिरवाळ यांची वैयक्तिक प्रतिमा तालुक्यावर कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय पाटील जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी यांचे तालुक्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर असलेले वर्चस्व यामुळे लागल्यापासून शिवसेनेत निवडणुकीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसने दिंडोरी तालुक्यात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून दिंडोरी पेठ तालुक्यातील जनतेने शिवसेना-भाजप युतीला नाकारत नरहरी झिरवाळ यांच्या रूपाने सर्वांच्या हाकेला धावून जाणारा लोकप्रतिनिधी निवडला आहे (चौकट- निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये - 1) विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत दिंडोरी तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी घेतली आहे 2) दिंडोरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी 3) शिवसेनेचे उमेदवार असलेले भास्कर गावित यांना यांच्या पेठ तालुक्यातून शिवसेनेला अत्यल्प मतांची आघाडी 4) नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येणार्‍या उमेदवार नरहरी झिरवाळ ठरले आहेत ) -------------------------- (दिंडोरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवाराच्या पराभवाची कारणे 1) निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीवरून सुरू असलेला घोळ 2) शिवसेनेचे तालुका पदाधिकारी यांचे ग्रामीण भागातील शिवसैनिकांशी नसलेला संवाद 3) उमेदवारीवरून शिवसेनेत पडलेली गट 4 ) निवडणुकीच्या दिवसापर्यंत कार्यकर्त्यांना मिळालेली कमी रसद 5) उमेदवार भास्कर गावित पेठ तालुक्यातील असल्याने दिंडोरी तालुक्यातील जनतेशी नसलेली ओळख . 6) सर्वाधिक मतदान असलेल्या दिंडोरी तालुक्यातील उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्याने दिंडोरी पेठ चा प्रांतवाद दिंडोरी तालुक्यातील मतदारांच्या मनात तयार झाला हे च्या पराभवाची प्रमुख कारणे आहेत . )Conclusion: निवडणुका लागल्यापासून शिवसेना पक्ष तयारीला लागला होता त्यात सुरुवातीला शिवसेनेत भास्कर गावित व व सदाशिव गावित हे दोघे जण इच्छुक होते ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेपूर्वी राष्ट्रवादी गेलेले माजी आमदार धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर आठ दिवसात माजी आमदार रामदास चारोस्कर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर पाच जण शिवसेनेच्या तिकिटासाठी इच्छुक झाल्याने त्याचे रूपांतर गटबाजी होण्यास सुरुवात झाली दिंडोरी तालुक्यातील 6 जि प सदस्य व पेठ तालुक्यातील दोन जि प सदस्य यांसह दोन्ही पंचायत समितीवर शिवसेनेची एक हाती सत्ता होती तसेच राज्यात व केंद्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्याने त्यांना भक्कम पाठबळ होते असे असतानाही निष्क्रिय पदाधिकारी व अखेरच्या क्षणापर्यंत असणारी गटबाजी यांचे रूपांतर भास्कर गावित यांच्या मोठ्या पराभवात झाले
Last Updated : Oct 26, 2019, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.