नाशिक Nashik Crime : कांद्याच्या गोणीत महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील दिंडोरी रोडवर असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळच्या परिसरात उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव गेतली. मात्र, हा मृतदेह कोणाचा आहे, याची अद्याप माहिती पोलिसांना मिळाली नाही. महिलेचा खून केल्यानंतर हा मृतदेह ( Nashik Crime ) इथं फेकण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी लवकरच मारेकऱ्याचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी दिली आहे.
कांद्याच्या गोणीत आढळला महिलेचा मृतदेह : नाशिकच्या म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी येत होती. त्यामुळे नागरिकांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतात पडलेल्या कांद्याच्या गोणीत पाहिलं असता, त्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती म्हसरुळ पोलिसांनी दिली.
तीन दिवसापूर्वी टाकला असावा मृतदेह : आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळच्या परिसरातील या भागात कोणी फारसं जातं येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतात तीन दिवसापूर्वी हा मृतदेह टाकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या महिलेचा खून करुन हा मृतदेह फेकला असावा, अशी उलट सुलट चर्चा परिसरात सध्या सुरू आहे. महिलेच्या मृतदेहावर अळ्या पडल्या असून मृतदेह कुजल्यानं परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांचं या कांद्याच्या गोणीकडं लक्ष गेलं, असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
पोलीस लवकरच लावणार मारेकऱ्याचा छडा : म्हसरुळ पोलीस ठाण्यात हद्दीत असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळच्या ाह मृतदेह फेकण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. फॉरेन्सिक लॅबचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. पोलिसांना घटनास्थळी काही कपडे मिळून आले आहेत. मृतदेह खून करुन या ठिकाणी आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत तपासात माहिती पुढं येईल. लवकरच आम्ही मारेकऱ्याचा छडा लावणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांनी दिली आहे.
हेही वाचा :