नाशिक - शहर व जिल्ह्यात शनिवारी (दि. ८ जानेवारी ) १ हजार १०३ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली ( Nashik Corona Update ) आहे. यापैकी एकट्या नाशिक शहरात ८५७ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जिल्ह्यात आढळलेल्या १ हजार १०३ नव्या कोरोनाग्रस्तांपैकी नाशिक शहरात ८५७ रुग्ण, ग्रामीण भागात २०१, मालेगावमध्ये ६ तर जिल्हाबाह्य ३९ रुग्णांचा समावेश आहे.
२ हजार ५६६ सक्रिय रुग्ण - आतापर्यंत ४ लाख १६ हजार ६३८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ५ हजार ३०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात २ हजार ५६६ सक्रिय रुग्ण ( Active Patients in Nashik ) असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.३८ टक्के - नाशिक ग्रामीण ४ हजार २५० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार २९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्ह्याबाहेरील १२६, अशा एकूण ८ हजार ७६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
'अशी' वाढली रुग्णसंख्या
- १ जानेवारी - १२२
- २ जानेवारी - ११७
- ३ जानेवारी - २१६
- ४ जानेवारी - ३२२
- ५ जानेवारी - ५०८
- ६ जानेवारी - ५३८
- ७ जानेवारी - ८३७
- ८ जानेवारी - १ हजार १०३
हेही वाचा - Conflict In Nashik : नाशकात दोन गटात तुफान हाणामाऱ्या.. लाठ्या - काठ्यांनी एकमेकांना झोडपले