ETV Bharat / state

..मग फक्त आमच्यावर निर्बंध का? दुकानदारांचा प्रशासनाला सवाल - नाशिक कोरोना घडामोडी

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील आठ दिवसात सक्रिय रुग्णांचा आकडा 5 हजारावर गेला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ह्यामुळे जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात वाजल्यानंतर अंशतः टाळेबंदी लागू केली आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. तसेच शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : Mar 12, 2021, 9:35 PM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी दुकानांच्या वेळेवर निर्बंध घातले आहेत. यातून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट देण्यात आली असून प्रशासनाने शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय चुकीचा असल्याचे छोट्या दुकानदारांनी म्हटले असून आमचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

नाशिक

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मागील आठ दिवसात सक्रिय रुग्णांचा आकडा 5 हजारावर गेला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. ह्यामुळे जिल्हा प्रशासनाने सायंकाळी सात वाजल्यानंतर अंशतः टाळेबंदी लागू केली आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. तसेच शनिवार आणि रविवारी पूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले. मात्र, गर्दी होणारी ठिकाणे, हॉटेल, बार, स्वीटमार्ट यांना वेळेत का सूट देण्यात आली आहे, ह्याबाबत छोट्या व्यवसायिकांनी आक्षेप घेत आमच्यावरच अन्याय होत असल्याचे म्हटले आहे.

अशीही उन्हामुळे बाजारात गर्दी नाही..

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात तापमानात ही मोठी वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस पर्यंत जात असल्याने सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून येत आहे.परिणामी दुपारी बाजारपेठेत ही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत नाही.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा

कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. मात्र दोन दिवस टाळेबंदी करणे चुकीचे असून प्रशासनाने एक दिवस दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला पाहिजे. आम्ही आमच्या दुकानात काम करणारे प्रत्येकजण मास्कचा वापर करतो, येणाऱ्या ग्राहकांना सुद्धा मास्क शिवाय दुकानात प्रवेश देत नाही. आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळतो. मात्र, दुसरीकडे गृह अलगीकरणातील नागरिक सर्रासपणे बाहेर फिरत असून त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करणे गरजेच आहे. आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांवर अन्याय करू नये, असे मत दुकानदार तीर्थ पटेल यांनी व्यक्त केले.

मग पूर्ण लॉकडाऊन करा..

शनिवार, रविवारी दुकाने बंद ठेवल्याने आमच्यासारख्या लहान दुकानदारांचे मोठे नुकसान होणार आहे. आधीच मागील वर्षाच्या टाळेबंदीमुळे आम्ही आर्थिक संकटात सापडलो, ते अद्याप सावरलो नाही. प्रशासनाला कोरोनावर नियंत्रण आणायचे असेल तर संपूर्णपणे टाळेबंदी करणे गरजेचे आहे. फक्त काही दुकाने बंद करून उपयोग होणार नाही असे मत दुकानदार दिपम रॉय यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.