ETV Bharat / state

#CORONA EFFECT : नवरात्रोत्सवासाठी कावड घेऊन आलेल्या भाविकांनी माघारी परतावे; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - nashik navratrotsav

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवाचे स्वरूप आणि प्रशासकीय नियोजन यांची माहिती माध्यमांना दिली. यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव वैयक्तिक पातळीवर साजरा करावा, असे आवाहन केले.

saptshrungi devi, nashik (file photo)
संप्तशृंगी देवी, नाशिक (संग्रहित)
author img

By

Published : Oct 16, 2020, 6:51 PM IST

नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव वैयक्तिक पातळीवर साजरा करावा. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कावड घेऊन आलेल्या भाविकांनी जिथे असाल तेथूनच माघारी परतावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवाचे स्वरूप आणि प्रशासकीय नियोजन यांची माहिती माध्यमांना दिली.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे याबाबत माहिती देताना.

ते म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात जरी असली तरी तिचा उद्रेक कधी होईल हे सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव व्यक्तिगत स्वरूपात साजरा करावा. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहेत. दरवर्षी, नवरात्रोत्सवात भरणारी सप्तश्रृंगी देवीची यात्रा या वर्षी विश्वस्त, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या सुसंवादातून रद्द करण्यात आली आहे. गडावर कावड, ज्योत घेऊन जाणारे भाविक यांना यावर्षी गडावर येण्यास मनाई असल्याने त्यांनी येऊ नये. जर कोणी निघाले असतील तर जिथे असाल तिथून त्यांनी मागे फिरावे. आपल्या गावी, घरी जाऊन देवकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले.

दरम्यान, गडावरील स्थानिक नागरिकांना पासेस दिले जाणार आहेत. मात्र, या पासेसचा कोणी गैरवापर करेल त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाणार आहे. भाविकांनी कुठेही गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

यंदाचा नवरात्रोत्सव आपण जर सार्वजनिक स्वरूपात न ठेवता व्यक्तिगत स्वरूपात ठेवला तर त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा घालण्यास नक्कीच मदत होईल. सर्वांनी जर ही काळजी घेतली तर पुढच्या वर्षीचा नवरात्रोत्सव आपण चांगल्याप्रकारे साजरा करू, असा विश्वास देखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.