नाशिक : Nashik Chandwad Accident : नाशिकच्या चांदवड तालुक्यातील नमोकार तिर्थक्षेत्रासमोर कार-कंटेनरचा भीषण अपघात (Car Container Accident) झालाय. यामध्ये कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारमधील मृत युवक हे धुळे जिल्ह्यातील असल्याचं सांगण्यात येतंय. ते सर्वजण नाशिककडून धुळ्याकडे चालले होते.
भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू : अपघातग्रस्तांची ओळख मात्र अद्याप पटली नाही. घटनेची माहिती मिळताच वडनेर भैरव पोलिसांसह, (Vadner Police) सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचलं होतं. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. या अपघातानंतर काही वेळ महामार्गही ठप्प झाला होता. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं महामार्गावरील वाहतूक सुरळित करण्यात आली आहे. भीषण अपघातात (Accident News) चार तरुणांचा मृत्यू (Four Death In Car Container Accident) झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अपघातात युवा उद्योजक ठार : रविवारी दुपारी कसारा घाटात पाऊस आणि दाट धुक्यामुळं कारचे चाक खड्ड्यात गेल्यानं गाडीखाली उतरून बघत असताना मागून येणाऱ्या ट्रकनं धडक दिली. यावेळी नाशिकच्या काठे गल्ली येथील उद्योजक पवन मोरे (वय 43) यांचा मृत्यू झाला. ते मूळचे खामखेडा बागलान येथील रहिवासी होते. स्पर्श बिल्डकॉनचे ते संचालक होते. साक्रीचा पांझर साखर कारखाना सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. नाशिकच्या अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर लगेच आज हा दुसरा अपगात याच भागात झालाय. यात चौघांचा जागीच मृत्यू झालाय.
हेही वाचा -
- Telangana Tourist Car Accident : चिखलदरा फिरायला आलेल्या तेलंगाणातील पर्यटकांच्या कारचा अपघात; चार बँक अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू
- British Embassy Secretary Car Accident : ब्रिटिश दूतावासाच्या सचिवांच्या कारला अपघात; खासगी बस चालकावर गुन्हा
- Satara Accident News : आयशर टेम्पो आणि मालट्रकचा भीषण अपघात; ३ जागीच ठार