नांदगाव (नाशिक) - नांदगांवच्या पानेवाडी ग्रामपंचायत निवडणूकित ईव्हीएम मशीनमधून उमेदवाराचे नाव गायब झाल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अर्ध्या तासानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सबंधित उमेदवाराचे नाव टाकल्यानंतर मतदान पूर्ववत सुरू करण्यात आले.
हेही वाचा - राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींचे कारभारी कोण? आज होणार मतदान
ईव्हीएम मशीन दुरुस्ती
आज होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर पानेवाडी येथे ईव्हीएम मशीनमध्ये एका उमेदवाराचे नाव व चिन्ह नसल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली उमेदवाराणे आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यानंतर तातडीने ईव्हीएम मशीन दुरुस्त अर्ध्या तासात मतदान सुरू करण्यात आले.
पानेवाडी संवेदनशील मतदार केंद्र
नांदगांव तालुक्यातील पानेवाडी हे गाव ऑइल कंपन्यामुळे प्रसिद्ध असून या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच प्रयत्न विविध पक्षाच्या वतीने करण्यात येतात या गावात शिवसेनेचेच 2 तगडे उमेदवार आले पॅनल एकमेकांसमोर घेऊन उभे असल्याने पानेवाडी हा मतदारसंघ संवेदनशील घोषित करण्यात आला आहे.
हेही वाचा - अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत निवडणुकीत साडी वाटप