नाशिक - स्वयंपाक चांगला न केल्याने पती आणि पत्नीमध्ये भांडण झाले. या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात दांडक्याने मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह सासर्याला ताब्यात घेतले.
लग्न झाल्यापासून दोघांचे आपापसात नेहमी वाद - नाशिकच्या औरंगाबाद रोड येथील माडसांगवी या विभागात विशाल कापसे व त्याची पत्नी आरतीही सोबत राहायची.त्या दोघांचे लग्न 2016 साली झालं होतं. विशाल आणि आरतीला ३ मुलं आहेत. लग्न झाल्यापासून दोघांचे आपापसात नेहमी वाद व्हायचे. अनेकदा क्षुल्लक कारणांवरून दोघे एकमेकांशी भांडायचे.16 तारखेला रात्री 11.30 वाजता या दोघांचे वाद विकोपाला गेले. पती विशाल कापसेनं आरतीला स्वयंपाक चांगला केला नाही यावरून वाद घालायला सुरुवात केली. या वादात विशालनं आरतीच्या डोक्यात दांड्याने मारहाण केली. त्यातच पत्नी आरतीचा मृत्यू झाला. पोलिस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी हत्येप्रकरणी संशयित पती विशाल,त्याचा भाऊ, काका आणि काकू सह 5 लोकांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपी विशालला ताब्यात घेतले आहे.सदर प्रकरणी आडगाव पोलीस तपास करत आहे.
स्वयंपाक चांगला न केल्याने पत्नीचा खून, पतीवर हत्येचा गुन्हा दाखल - नाशिक पत्नीची हत्या बातमी
विशाल आणि आरतीला ३ मुलं आहेत. लग्न झाल्यापासून दोघांचे आपापसात नेहमी वाद व्हायचे. अनेकदा क्षुल्लक कारणांवरून दोघे एकमेकांशी भांडायचे.16 तारखेला रात्री 11.30 वाजता या दोघांचे वाद विकोपाला गेले. पती विशाल कापसेनं आरतीला स्वयंपाक चांगला केला नाही यावरून वाद घालायला सुरुवात केली. या वादात विशालनं आरतीच्या डोक्यात दांड्याने मारहाण केली. त्यातच पत्नी आरतीचा मृत्यू झाला.