ETV Bharat / state

नाशिकमध्ये व्यावसायिक स्पर्धेतून हत्या; आरोपीला अटक - नाशिक गुन्हे वार्ता

व्यावसायिक स्पर्धेतून एकाने दुसऱ्या व्यावसायिकावर चाकू हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना रासबिहारी लिंक रोड भागात घडली आहे.

Nashik crime news
Nashik crime news
author img

By

Published : Aug 27, 2021, 8:55 PM IST

नाशिक - खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यावसायिक स्पर्धेतून एकाने दुसऱ्या व्यावसायिकावर चाकू हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना रासबिहारी लिंक रोड भागात घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली आहे. आकाश काळे (रा. मते मळा, त्रिकोणी बंगल्यामागे पंचवटी), असे या आरोपीचे नाव आहे.

प्रतिक्रिया

म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल -

दोन्ही व्यावसायिकांचे रासबिहारी लिंकरोडवरील कळसकरनगर भागातील मते मळा परिसरात चहा आणि खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास तुषार काळे आपल्या व्यवसाय सांभाळत असताना आकाश काळे तेथे आला. पावडा आणि चहा कमी दराने का विकतो आणि माझी बदानामी का करतो, असे म्हणत त्याने वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर आकाश काळे याने तुषार काळेवर प्राण घातक हल्ला केला. या हल्ल्यात तुषार गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; तर्कवितर्कांना उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.