नाशिक (येवला ) - नागपूर येथील नगरपालिकेचे सफाई कर्मचारी म्हणून कार्य करणारे दिलीप मलिक आपल्या तीन सायकल स्वरांसोबत विविध जिल्ह्यांतून सायकल प्रवासाला निघाले असून, यात दोन मुलींचाही समावेश आहे. यामध्ये तब्बल 45 हजार 711 किलोमीटरचा प्रवास हे चारहीजण सायकलीवर करणार असून याद्वारे विविध संदेश या सायकल यात्रेचे देणार आहे.
प्रजासत्ताक दिनापासून हे चारही सायकलस्वार सायकल प्रवासाला
सायकल यात्रा येवला येथे आली असता यावेळी कोटमगाव जगदंबा माता मंदिरच्या वतीने या सायकलस्वरांचे स्वागत करण्यात आले. प्रजासत्ताक दिनापासून हे चारही सायकलस्वार सायकल प्रवासाला सुरुवात केली असून यामध्ये दोन मुलींचाही समावेश असून संपूर्ण भारत भ्रमण करणार असून याद्वारे शहीद सैनिकांना श्रद्धांजली, बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे वाचवा, प्रदूषण मुक्त भारत असे विविध संदेश आपल्या सायकल प्रवासादरम्यान देत हे सायकलस्वार प्रवासाला निघाले आहेत.
हेही वाचा - लता दीदींच्या स्मारकावरून वाद हे रोगट मानसिकतेचे लक्षण! रोखठोक'मधून भाजपवर हल्ला