नाशिक - पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांच्या स्कोडा गाडीला अपघात झाला. त्र्यंबकेश्वर-नाशिक रोडवरील बेझ फाट्याजवळ कार पुलावरुन खाली कोसळल्यामुळे हा अपघात झाला. या घटनेत १ जण ठार आणि रोहितसह १ जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघातावेळी गाडीत रोहितसोबत डॉ. संजय शिंदे (४५, रा. मोखाडा) होते. त्यांचा या अपघातात मृत्यू झाला तर रोहित आणि जतीन संखे गंभीर जखमी झाले. जखमींवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कार भरधाव वेगात असल्याने बेझ-वाढवली रस्त्यादरम्यान असलेल्या एका अरुंद पुलाचा चालकाला अंदाज न आल्याने ती थेट पुलावरुन खाली कोसळल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढच्या बाजूचा चेंदामेंदा झाला आहे.