ETV Bharat / state

मराठा समाजासाठी पहिला वार छातीवर घेण्यास तयार - छत्रपती संभाजीराजे - छत्रपती संभाजी राजे न्यूज

मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याही मोहिमेवर मी समाजासोबत असून कुठलाही पहिला वार माझ्या छातीवर होऊ द्या, मी कुणालाही भीक घालणार नाही, असे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

mp chhatrapati sambhaji raje on maratha reservation in nashik
मराठा समाजासाठी पहिला वार छातीवर घेण्यास तयार - छत्रपती संभाजीराजे
author img

By

Published : Sep 27, 2020, 8:19 AM IST

नाशिक - मराठा समाजाचा नेता म्हणून नाही तर छत्रपतींचा मावळा म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याही मोहिमेवर मी समाजासोबत आहे. कुठलाही पहिला वार माझ्या छातीवर होऊ द्या. मी कुणालाही भीक घालणार नाही, अशा शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत समाजाला आश्वासीत केले. मराठा आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी नाशिकमध्ये शनिवारी राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे भोसले बोलत होते.

विद्यमान परिस्थितीत आरक्षणाबाबत मराठा समाजात निर्माण झालेले समज गैरसमज, भरकटत जाणारे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन यावर मार्ग काढून मराठा आंदोलनाला निर्णायक दिशा देण्यासाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत राज्यभरातून आलेल्या समन्वयकांनी भूमिका मांडली. या बैठकीत एकूण २३ ठराव संमत करण्यात आले.

अ‌ॅड. तांबे यांनी सामाजिक आरक्षणाविषयी आजपर्यंत घडलेल्या घडामोडींचा उहापोह करताना मंडल आयोगाने केलेली मराठा समाज पुढारलेला आहे ही शिफारस धादांत खोटी आणि वस्तुस्थिती नाकारणारी असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. तर सर्वोच्च न्यायालयात काम करणारे अ‌ॅड. श्रीराम पिंगळे यांनी मराठा आरक्षणाची मुद्देसुद व्यथा मांडली. एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण सुरक्षीत करायचे असेल तर राज्यपालांमार्फत हा प्रवर्ग राष्ट्रपतींना नोटीफाय करण्याची विनंती, घटना दुरूस्ती करून आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा रद्द करण्यासाठी केंद्र सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून अथवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दबाव आणणे यांसारखे काही पर्याय सुचवले.

करण गायकर बोलताना
नाशिकच्या वतीने सुनील बागूल यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा, विविध विषय समित्या नियुक्त कराव्यात, आंदोलनासाठी खर्चाची जबाबदारी नाशिक जिल्हा स्वीकारण्यास तयार आहे, अशी भूमिका मांडली. बैठकीचा समारोप छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाने झाला. समाज जी जबाबदारी देईल प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी मराठाच नाही बहुजन समाजासाठी काम करतो. आठरा पगड बारा बलुतेदारांचे स्वराज्य निर्माण केलेल्या छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून या वारशाला धक्का लागेल, असे कृत्य मी करणार नाही. सातारा असो की कोल्हापूर दोन्ही घराणे, एकच आहेत. छत्रपती घराण्यात भांडणे लावण्याची कागाळी कुणी करीत असेल त्याच्या नांग्या ठेचाव्या लागतील, अशा इशारा छत्रपतींनी यावेळी दिला.सरकार कुणाचेही असो आता आंदोलनाची तलवार म्यान करायची नाही. ओबीसी समाजात मराठा समाजाला आरक्षण नको, अशा सुचना करून महाविकास आघाडी सरकारने आर्थिक विकास महामंडळाला एक छदामही दिला नसल्याची खंत आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. बैठकीच्या शेवटी महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या १० ऑक्टोबरला काही उत्साही मंडळींनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाशी सकल महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाच कुठलाही संबंध नाही, असा ठराव नाशिकच्या राज्यस्तरीय बैठकीत संमत झाल्याचे करण गायकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.