ETV Bharat / state

'अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे त्वरित पंचनामे करा'

author img

By

Published : Jan 11, 2021, 12:41 PM IST

Updated : Jan 11, 2021, 1:36 PM IST

नाशिक जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे साडे तीन हजार हेक्टर द्राक्षबागांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पुरता संकटात सापडला आहे. यावर खासदार पवार यांनी तत्काळ जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत .

द्राक्ष बागांचे त्वरित पंचनामे करा'
द्राक्ष बागांचे त्वरित पंचनामे करा'

नाशिक - भाजपाच्या खासदार भारती पवार यांनी दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्ष पिकांची पाहणी केली. द्राक्ष बागेत अद्यापही काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र यावेळी दिसून आले. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करण्याच मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार रीतसर पंचनामे करण्याचे आदेश खासदार पवार यांनी संबंधित प्रशासकीय विभागास दिले आहेत.

द्राक्षबागांसह रब्बी पिकांचे नुकसान-

नाशिक जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे साडे तीन हजार हेक्टर द्राक्षबागांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पुरता संकटात सापडला आहे. अतिशय उत्तम निर्यातक्षम दर्जाचे द्राक्ष उत्पादित झाले असतांना अवकाळी पावसाच्या रुपाने आलेल्या अस्मानी संकटामुळे द्राक्षबागा तसेच कांदा, गहू व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात होती.

'अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे त्वरित पंचनामे करा'

डॉ. भारती पवार यांच्याकडून पाहणी व सूचना
खासदार भारती पवार यांनी प्रशांत घुमरे यांच्या द्राक्षबागाची पाहणी केली. घुमरे यांचे काळी सोनाका जातीचे द्राक्ष पीक विक्रीसाठी तयार झाले. मात्र, गेल्या दोन तीन दिवसाच्या पावसाने द्राक्षबागाचे नुकसान झाले आहे. त्या द्राक्षबागामध्ये पाणी साठल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. काढणीसाठी तयार झालेला माल पावसामुळे खराब झाल्याचे शेतकरी घुमरे यांनी पवार यांना निदर्शनास आणून दिले. यावर खासदार पवार यांनी तत्काळ जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत .

निफाड, दिंडोरी तालुक्यातील नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे पत्र दिले आहे. या पाहणूी दौऱ्यावेळी दिंडोरी भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, सरचिटणीस योगेश तिडके, जानोरीचे गावचे उपसरपंच गणेश तिडके ग्रा. प सदस्य विष्णुपंत काठे, शेतकरी सुदर्शन घुमरे, सुनील तिडके तसेच कृषी अधिकारी, संबंधित तलाठी निफाड भाजपा तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, दिंडोरी भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

Last Updated : Jan 11, 2021, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.