नाशिक - कोरोना विषाणूनं संपूर्ण जग वेठीस धरल आहे. मात्र या आजारावर अद्याप उपचार मिळाला नसल्याने सामाजिक अंतर राखणे हाच एक पर्याय सर्वांसमोर आहे. मात्र याच सामजिक नंतराने एका पाच दिवसाच्या बाळाला आपल्या आईपासून दूर केलं आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित पाच दिवसांच्या बाळावर उपचार सुरू आहेत. मात्र आपलं बाळ आपल्यापासून दूर असल्याने आईच्या मनाची घाळमेल सुरू आहे. आईचं मुलाबद्दल असलेली ओढ बघता डॉक्टर आणि परिचारिका दिवसातून दोनदा व्हिडिओ कॉल करून आईचा आणि बाळाचा संपर्क घडवून आणत आहेत.
कोरोनामुळे आई अन् नवजात बाळाची ताटातूट.. व्हिडिओ कॉल करून माय-लेकराचा संपर्क, परिचारिका आईच्या भूमिकेत
नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेचे नमुने कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला, मात्र नवजात मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मुलाला आईपासून दूर ठेवण्यात आले आहे. आपलं बाळ आपल्यापासून दूर असल्याने आईच्या मनाची घाळमेल सुरू आहे. आईचं मुलाबद्दल असलेली ओढ बघता डॉक्टर आणि परिचारिका दिवसातून दोनदा व्हिडिओ कॉल करून आईचा आणि बाळाचा संपर्क घडवून आणत आहेत.