ETV Bharat / state

#corona effect : जमावबंदी नियमाचा भंग केल्याने नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल - shopkeeper in nashik

जमावबंदीच्या आदेशानंतरही दुकानदाराने वस्तूंवर 50 टक्के सूट दिल्याने महिलांनी दुकानात प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेच ते दुकान
हेच ते दुकान
author img

By

Published : Mar 17, 2020, 9:39 PM IST

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नाशिक पोलिसांनी जमावबंदी कायदा लागू केला आहे. याअंतर्गत शालिमार येथील सोनी गिफ्ट या दुकानाच्या मालकाविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम 188प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या दुकानात महिला दिनानिमित्त काही वस्तूंवर 50 टक्के सूट दिल्याने इथे महिलांची कालपर्यंत (सोमवार) मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

जमावबंदी नियमाचा भंग केल्याने नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल

नाशिक शहरात कोरोनासदृश रुग्ण मिळून आल्याने सर्वच प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सरकारकडूनदेखील 31 मार्चपर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालय, मॉल, व्यायामशाळा, चित्रपटगृह, नाट्यगृह, उद्याने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतरही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शालिमार भागातील सोनी गिफ्ट या कॉक्रीच्या शोरूममध्ये महिला दिनानिमित्त प्लस्टिक आणि काचेच्या वस्तूंवर 50 टक्के सूट दिल्याने इथे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

शहरात पोलिसांनी कलम 188प्रमाणे जमावबंदी लागू केल्यानंतरसुद्धा या कायद्याची पायमल्ली केल्याने भद्रकाली पोलिसांनी कलम 188 प्रमाणे दुकान मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : पुण्याहून नाशिकला येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची होतेय नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.