नाशिक - देवदर्शनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर ( Raj Thackeray Nashik Visit ) असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी शिर्डित साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर रविवारी साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शन ( MNS Chief Raj Thackeray ) घेतले. यावेळी राज यांनी सपत्नीक देवीची आरती केली. दरम्यान, हा राजकीय दौरा नसल्याचं राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी सांगितलं आहे.
मात्र,आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या ( Nashik Municipal Election ) पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.