नाशिक MNS On Marathi Board : इंग्रजी पाट्यांविरोधात मुंबईपाठोपाठ नाशिकमध्येही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात मनसेनं आंदोलन करत इंग्रजी पाट्यांना काळं फासलंय. मराठी पाट्या लावा, अन्यथा तुमच्या तोंडाला काळं फासलं जाईल, असा इशाराही मनसेनं दुकानदारांना दिलाय.
मराठी पाट्या न लावल्यास तुमच्या तोंडालाही काळं फासू : मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर राज्यभरात मनसेनं आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. इंग्रजी पाट्यांविरोधात नाशिकमध्ये मनसेनं शहरातील कॉलेज रोड परिसरात आंदोलन करत इंग्रजी पाट्यांना काळं फासलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 'मराठी पाट्या लावा, अन्यथा तुमच्या तोंडाला काळं फासलं जाईल', असा दिला इशारा देखील मनसेनं दुकानदारांना दिलाय. यामुळं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच पुढील दोन दिवसात मराठी पाट्या लावा, अन्यथा मनसे स्टाईलनं आंदोलन छेडू, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी व्यवसायिक दुकानदारांना दिलाय.
मनसे स्टाईल उत्तर देऊ : राज ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये सर्व दुकानांच्या मराठी पाट्या असाव्या यासाठी आग्रही भूमिका मांडली होती. त्या अनुषंगानं काही व्यापारी वर्ग हा सर्वोच्च न्यायालयात गेला होता. पण सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा त्यांना दोन महिन्यांमध्ये तुम्ही मराठी पाट्या लावा, असं सांगितलं. परंतु, सर्वोच्च न्यायालयानं सांगूनही काही दुकानदारांनी मराठीत पाट्या लावल्या नाहीत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मराठी पाट्यांचं आंदोलन सुरु आहे. संपूर्ण मनसैनिक सर्व पदाधिकारी महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्या लावाव्या यासाठी आग्रही आहेत. म्हणून नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलन केलं. मात्र, आंदोलन करुनही मराठी पाट्या लावल्या नाहीत, तर मनसे स्टाईल उत्तर दिलं जाईल, असा इशारा नाशिकचे मनसे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी दिला आहे.
हेही वाचा :
- मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक, एमजी मोटर्सच्या पाट्यांवर फेकले काळ्या शाईचे फुगे; पाहा व्हिडिओ
- दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यावर कारवाई करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू
- Sudhir Mungantiwar on SC Hearing : न्यायालयानं इतकी वर्षे अडकवून ठेवला राम मंदिराचा प्रश्न; मात्र...; काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ?