ETV Bharat / state

Punishment for Bachu Kadu : आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा, नाशिक सत्र न्यायालयाचा निकाल

author img

By

Published : Mar 8, 2023, 3:05 PM IST

Updated : Mar 8, 2023, 3:20 PM IST

आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अपंगांच्या मागण्यांसाठी 2017 मध्ये बच्चू कडू यांनी नाशिक महापालिकेत आंदोलन केले. त्यानेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांशी बोलतांना आवार्च भाषेचा वापर केला होता.

Punishment for Bachu Kadu
Punishment for Bachu Kadu

आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा

नाशिक : सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक, तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी एक अशी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2017 साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी नाशिक महापालिकेत केलं होते आंदोलन या आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा निकाल आज सुनावण्यात आला आहे..

दोन वर्षाची शिक्षा सुनावली : मला सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, मला याचं दुःख नाही. कारण की मी ज्या दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत नाशिकला आलो होतो. त्यानंतर आता दिव्यांग मंत्रालय झाल्याचा आनंद जास्त आहे. मात्र, दुसरीकडे दुःख याचं वाटतं की ज्या व्यक्तींनी दिव्यांगांचा निधीचा वापरच केला नाही, अशा अधिकाऱ्यांची पदोन्नती होते. या निकाल विरोधात आम्ही वरच्या कोर्टात जाऊ असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

काय होते प्रकरण : नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, म्हणून 2017 मध्ये प्रहार संघटनेच्या वतीने नाशिक महापालिकेवर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला होता. त्यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर हात उगारला होता. तसेच त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ केली होती. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद सोडविला होता. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता

या आधी देखील शिक्षा : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार न्यायालयाने आमदार ​​बच्चू कडू यांना 2014 मध्ये अचलपूरचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या तक्रारीत दोषी ठरवले होते. त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा साधा कारावास आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

हेही वाचा - Indian Navy Helicopter Crashed: मुंबईजवळ भारतीय नौसेनेचे हेलिकॉप्टर कोसळले, जीवितहानी नाही

Last Updated : Mar 8, 2023, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.