ETV Bharat / state

Dada Bhuse Lalit Patil Photo : ड्रग्ज माफिया ललित पाटीलसोबत मंत्री दादा भुसेंचा फोटो व्हायरल; सुषमा अंधारे म्हणाल्या...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 10:42 PM IST

Drugs Mafia Lalit Patil: ललित पाटील याचा शिवसेना पक्षप्रवेशाचा फोटो समोर आला आहे. या फोटोत ललित पाटील, दादा भुसे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे दिसत आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Minister Dada Bhuse  Photo
मंत्री दादा भुसे यांचा फोटो व्हायरल

नाशिक : Dada Bhuse Lalit Patil Photo : ड्रग्ज माफिया ललित पाटीलसोबत मंत्री दादा भुसे यांचा फोटो (Dada Bhuse Photo With lalit Patil) व्हायरल झाल्यानं वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. 2016 मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित ललित पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या फोटोच्या निमित्ताने दादा भुसे (Minister Dada Bhuse) आणि ललित पाटील (Lalit Patil) यांच्यासोबत काही कनेक्शन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अद्यापही ललित पाटील याचा पत्ता नाही : ड्रग्ज माफिया ललित पाटील हा पुण्याच्या हॉस्पिटलमधून पळून जाण्याच्या घटनेला आठ दिवसांचा कालावधी झाला. मात्र, अद्यापही ललित पाटील याचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. पण या घटनेत राज्य सरकारमधील शिंदे गटाच्या मंत्र्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटातील मंत्री दादा भुसे यांनी ललित पाटील यांना ससून रुग्णालयात दाखल करण्याकरता फोन केला होता, असा आरोप केला आहे. अशात आता 2016 मध्ये उद्धव ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थित ललित पाटील याने शिवसेनेत प्रवेश केल्याचा फोटो व्हायरल होत असल्याने, दादा भुसे आणि ललित पाटील यांच्यासोबत काही कनेक्शन आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाना पटोले यांनी केला होता आरोप : नाशिकमध्ये साकीनाका पोलिसांनी शिंदे गावात तीन दिवसापूर्वी टाकलेल्या छाप्यात एमडी या अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उध्वस्त करत 300 कोटींचा साठा जप्त केला होता. त्यानंतर नाशिक पोलीसही सतर्क झाले होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी शिंदे गावात एका बंद पडलेल्या गोदामावर छापा टाकून सहा कोटीचा एमडीचा साठा व रसायन जप्त केले. करोडो रुपयांचे एमडी ड्रग्ज मिळून आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली होती. तर या एमडी ड्रग्ज माफियांबद्दल आम्हाला देखील माहिती मिळाली आहे. यात काही आमदार देखील सहभागी आहेत. येत्या अधिवेशनात आमच्याकडचे पुरावे आम्ही सादर करू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलाय. नाना पटोले यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी अधिवेशनाची वाट न बघता ते सादर करावे, असं आव्हान मंत्री दादा भुसे यांनी दिलंय.

ड्रग्ज माफिया पोलिसांच्या ताब्यात : नाशिकमध्ये मुंबई साकीनाका पोलिसांनी नाशिकरोड जवळील शिंदे गांव एमआयडीसीमध्ये छापा टाकून 300 कोटी रुपयांचा (एमडी) मॅफेड्रोन ड्रग्ज व साहित्य ताब्यात घेत एक संशयितास ताब्यात घेतले होते. यांची खबर नाशिक पोलिसांना नव्हती यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तेव्हापासून भूषण पाटील व त्याचा सहकारी फरार होते. भूषण पाटील हा केमिकल इंजिनिअर असल्याने तो एमडी तयार करायचा असे सांगितले जाते. त्याचा भाऊ ललित पाटील हा पुण्यातून ते ड्रग विक्री करायचा व यांचा साथीदार अभिषेक बलकवडे हा ड्रग्ज वाहतूक करून सांगितलेल्या ठिकाणी पोहच करत होता. ललित पाटील हा ससून हॉस्पिटलमधून सहज पळून गेलाय. त्यानंतर भूषण व त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे फरार होते. यांच्या मागावर पूणे, मुबंईसह नाशिक पोलीस होते. मात्र, पुणे पोलिसांनी त्याचा छडा लावत उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधून ताब्यात घेतले. मात्र, ललित पाटील अद्याप फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा -

  1. मंत्री दादा भुसेंचा अजब सल्ला; कांदा परवडत नसेल तर...
  2. Dada Bhuse Criticized Aaditya Thackeray: आम्हाला आदित्य ठाकरेंविषयी द्वेषभावनेने बोलायचे नाही - मंत्री दादा भुसे
  3. Maharashtra Cabinet Expansion 2022 : 'हे सरकार जनतेच्या विश्वासावर खरी उतरणार'- कॅबिनेट मंत्री दादा भुसे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.