नाशिक - राजकारणात प्रहार सहन करण्याची तयारी ठेवावी लागते. आज जसे हार पडत आहेत, तसे प्रहारही पडलेत. पण सध्या राजकारणात लोकांची सहनशक्ती कमी होत आहे. जास्त बोलले तर सत्तेचा दुरुपयोग केला जातो. केंद्र सरकारचा कारभार तर अवर्णनीय आहे. तुम्ही सरळ वागलात की तुमचा भुजबळ करू हा वाक्प्रचार झाला होता. पण आता लोक हुशार झालेत. जास्त काळ आपण लोकांना मूर्ख बनवू शकत नाही हे सिद्ध झाल. त्यामुळे तुमचा भुजबळ करु आता हा वाक्य प्रचार बदलावा लागेल, या शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता भाजपाला निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यावर नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
लोकशाही आहे, त्यांनी खुशाल हायकोर्टात जावे. आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ असे सांगत महाराष्ट्र सदन प्रकरण शेवटच्या टप्प्यात आलेले असतांना निवडणुकांमुळे शिळ्या कढीला ऊत आणला गेला. नाशिकला आले काय किंवा कुठेही गेले काय, काय झाले? माध्यमांमध्ये किती महत्व मिळाले ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत 'मेरे खिलाफ होनेवाली बातो को मै अक्सर खामोशी से सूनता हु, जबाब देने का हक मैने वक्त को दे रखा है' अशा शब्दात त्यांनी यावेळी विरोधकांवर टीका केली.
'सत्तेचा दुरुपयोग केला जातो'
आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होते. तुरुंगात असतांना भुजबळांना तुरुंगातून सोडा, या मागणीसाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. असंख्य लोकांचे आशीर्वाद आपल्यासोबत होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विधानसभा लढलो. विचारांच्या माध्यमातून लढाई लढलो. त्यावेळी थोडे जास्त बोलले जाते. त्यातून काही जण दुखावले जातात. त्यानंतर सत्तेचा दुरुपयोग केला जातो व ईडी चौकशी मागे लावले जातात, असा आरोप भुजबळ यांनी केला आहे.
'गॅस, पेट्रोल किती स्वस्त झाले हे लोकांना कळत'
आगामी काळात निवडणूका असून प्रत्येकजणांनी आपले झेंडे बाहेर काढेल. त्यावेळी आरोप प्रत्यारोपाची भाषा अधिल टोकदार होईल. कोणाची शैली मंजुळ तर कोणाची अणुकुचीदार असेल, असे सांगत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असून आपण बोलणारच, असा इशारा त्यांनी भाजपाला दिला. तसेच जनता सब जानती है सांगत गॅस किती स्वस्त झाला, पेट्रोल किती स्वस्त झाले हे लोकांना कळते. राष्ट्राची संपत्ती किती वाढत आहे. कोण विकत आहे, कोण खरेदी करत आहे, हे जनतेला सर्व कळत आहे. जनता मत पेटीतून त्याचे उत्तर देईल, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे. देशात लोकशाही आहे. अंजली दमानियांनी खुशाल हायकोर्टात जावे. मात्र त्यामुळे आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ, असे भुजबळ यांनी सांगितले आहे.
'सोमैयांडून शिळ्या कढीला उत'
महाराष्ट्र सदन प्रकरण शेवटच्या टप्प्यात आलेले असतांना किरीट सोमैयाकडून निवडणुकांमुळे शिळ्या कढीला ऊत आणला जात आहे. आता नाशिकला आले काय किंवा कुठेही गेले काय, काय झालं ? असा प्रश्न उपस्थित करत माध्यमांमध्ये किती महत्व मिळाले, या शब्दांमध्ये त्यांनी सोमैया निशाणा साधला. नाशिक - मराठवाडा पाणी वाटपाबाबत बोलतांना ते म्हणाले की, गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे समन्यायी वाटप आहे. ते त्यानुसार होईल. नाशिक तसेच मराठवाडा कुणावरही अन्याय होणार नाही. त्याचबरोबर नाशिकची जलसंपदाची कार्यालय नाशिकहून कुठेही हलवली जाणार नाहीत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - रावसाहेब दानवेंच्या घरीही बाप्पाचं आगमन; कोरोनाचे नियम पाळा, दानवेंचं आवाहन