ETV Bharat / state

Nashik Corona Update : कोरोनाने 4 हजार जणांचा मृत्यू ; अनुदानासाठी 8 हजार अर्ज दाखल - वैद्यकीय विभागाची 1702 अर्जांना मंजुरी

नाशिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची 4 हजार 29 मृत्युची नोंद (4029 deaths due to corona Nashik ) आहे. तर सरकारने जाहीर केलेल्या 50 हजारांचे अनुदान मिळवण्यासाठी तब्बल आठ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सध्या गोंधळ निर्माण झाला आहे. हा गुंता सोडवण्यासाठी 6 नोडल अधिकारी नियुक्त ( 6 Nodal Officers appointed ) केले आहेत.

Nashik Corona Update
Nashik Corona Update
author img

By

Published : Jan 12, 2022, 10:35 AM IST

नाशिक: राज्यात कोरोना महामारीने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर राज्य सरकारने कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे. तसेच आता योजनेचा लाभ घेण्यासाठी गोंधळ निर्माण झाला आहे. कारण नाशिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची 4 हजार 29 मृत्युची नोंद आहेत. त्याचबरोबर शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे (Nashik Municipal Corporation Medical Department ) तब्बल आठ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.

त्यानुसार जर जवळपास आठ हजार मृत्यू असे गृहीत धरले. तर सरकारी आकडेवारीत केवळ 4 हजार 29 मृत्यूची नोंद असून उर्वरित 4 हजार अर्ज खरे की खोटे असा प्रश्न, उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता वैद्यकीय विभागाने 6 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जे सर्व कागदपत्रांची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान कागदपत्रे तपासणी करून वैद्यकीय विभागाने आतापर्यंत 1702 अर्जांना मंजुरी (Medical department 1702 applications Approved ) दिली आहे. तसेच बाकीच्या अर्जांच्या कागदपत्रांची सूक्ष्म तपासणी सुरु आहे. त्यामुळे यामध्ये अजून किती अर्ज खरे आणि किती खोटे हे निष्पन्न होणार आहे.

महानगरपालिकेने शासन आदेशानुसार शहरात सहा ठिकाणी यासाठी व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर कागदपत्र तपासणीसाठी 6 नोडल अधिकारी नियुक्त ( 6 Nodal Officers appointed ) केले आहेत. तसेच अर्ज निकाली काढण्यासाठी आयुक्तांनी 15 जानेवारीचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र आता कोरोनाचे बळी नेमके किती हा प्रश्न आहे? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आयसीएमआरकडे ( ICMR ) नोंदणीकृत आटीपीसीआर चाचणी (ATPCR test ) करण्याची संधी मिळाली नव्हती. तसेच कोरोनाचे लक्षण आढळल्यानंतर छातीचा स्कॅन करून घेतले गेले. या दरम्यान मृत्यू झाल्यानंतर अधिकृत आयसीएमआर पोर्टलवर आरटीपीसीआर नसल्याने नोंद झाली नव्हती. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याची शक्यता आहे.

हेही वाचा - MNS Lady Worker Bullying In Nashik : नाशिकमध्ये मनसे महिला पदाधिकाऱ्याची दादागिरी, बांधकाम व्यावसायिकाला मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.