ETV Bharat / state

पेठ, दिंडोरीला स्थानिक विकास निधीतून ४१ लाख ३० हजारांचे वैद्यकीय साहित्य

पेठ ग्रामीण रुग्णालय व सात-बारा केंद्र आणि दिंडोरी तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालयांसह दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी स्थानिक विकासनिधीतून ४१ लाख ३० हजार रुपयांची मदत केली. या निधीतून कोरोना लढ्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री घेण्यात आली आहे.

वैद्यकीय साहित्य वाटप
वैद्यकीय साहित्य वाटप
author img

By

Published : May 12, 2020, 8:20 AM IST

नाशिक - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच स्तरांवरुन प्रयत्न होत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रणासाठी पेठ तालुक्यातील पेठ ग्रामीण रुग्णालय व सात-बारा केंद्र आणि दिंडोरी तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालयांसह दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी स्थानिक विकासनिधीतून ४१ लाख ३० हजार रुपयांची मदत केली. या निधीतून कोरोना लढ्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री घेण्यात आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते याचे वाटप झाले.

वैद्यकीय साहित्य वाटप
वैद्यकीय साहित्य वाटप

या साहित्याचा वापर कोविड १९ सेंटर तसेच डेडिकेटेड कोविड-१९ सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी केला जाणार आहे. या निधीच्या माध्यमातून देण्यात आलेले आवश्यक वैद्यकीय साहित्य व इतर बाबींचे वितरण झिरवाळ यांनी केले.

यावेळी पेठ तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोतीलाल पाटील व कोचरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. खोकले यांनी हे साहित्य स्वीकारले. पेठ तहसीलदार संदीप भोसले, दिंडोरी तहसीलदार कैलास पवार, गोकुळ झिरवाळ तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

पेठ तालुक्यासाठी देण्यात आलेले साहित्य
ऑक्सी मिटर ८, पीपीइ किट ५००, एन-९५ मास्क एक हजार, नेब्युलायझर ५, सॅनीटायझरच्या दोन हजार बॉटल, चादरी १८८, बेडशीट ११९ व फोम गाद्या ३० देण्यात आल्या आहेत.

दिंडोरी तालुक्यासाठी देण्यात आलेले साहित्य
दिंडोरी तालुक्यासाठी १२ ऑक्सिमीटर, पीपीई किट ५००, एन- ९५ मास्क एक हजार, नेब्युलायझर ५, सॅनिटायझर दोन हजार बॉटल, चादरी २१६, बेडशीट १५३, फोम गाद्या ३६ देण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.