ETV Bharat / state

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'आरपीआय'कडून मास्क अन सॅनिटायझरचे वाटप

मनमाड शहर रिपब्लिकरन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी (दि. 6 डिसें.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना मास्क व हॅण्ड सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

अभिवादन
अभिवादन
author img

By

Published : Dec 6, 2020, 3:58 PM IST

मनमाड (नाशिक) - भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरी जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन करत घरूनच अभिवादन करण्यासाठी विनंती केली होती. त्यास राज्यातील जनतेने प्रतिसाद देत रविवारी (दि. 6 डिसें.) आपल्या घरातच अभिवादन केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'आरपीआय'कडून मास्क अन सॅनिटायझरचे वाटप

मनमाड शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी (दि. 6 डिसें.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत ज्येष्ठ नागरिक तसेच नागरिकांना मास्क व हॅण्ड सॅनिटायझर वाटप केले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते तसेच युवक आघाडी व महिला आघाडी पदधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. आंबेडकरांचे मनमाडशी घनिष्ठ नाते

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनमाड शहरांशी अगदी जवळचे नाते होते. मनमाड येथे 12 व 13 फेब्रुवारी, 1938 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भव्य अशी कामगार, महिला व युवक परिषद घेतली होती. तसेच मिलिंद महाविद्यालयाचे कामकाजही त्यांनी मनमाड येथे मुक्कामी राहून पाहिले होते. तर त्यांच्या नावाने व त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेली बोर्डिंग देखील येथेच आहे.

हेही वाचा - त्र्यंबकेश्वरमधील वारूनसे मळ्यात भीषण आग; 6 एकरवरील ऊस खाक

होही वाचा - आंबे वरखेडा येथील दोन शाळकरी मुलांनी तयार केली इलेक्ट्रिक सायकल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.