ETV Bharat / state

घरगुती कारणातून सावकी येथे विवाहितेची आत्महत्या - कोमल देवरे

आज(3 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास देवळा तालुक्यातील सावकी येथील कोमल अतुल देवरे (वय २१) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या आली. घरगुती कारणातून ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

घरगुती कारणातून सावकी येथे विवाहीतेची आत्महत्या
author img

By

Published : Aug 3, 2019, 10:03 PM IST

नाशिक - घरगुती कारणातून देवळा तालुक्यातील सावकी येथील एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. कोमल अतुल देवरे (वय २१), असे या महिलेचे नाव आहे. आज (3 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोमलचे सासरे (दिलीप देवरे) हे एनडीसीसी बँकेचे कर्मचारी आहेत. ते कामावर गेले होते तर, त्यांची पत्नी या काही दिवसांपासून माहेरी गेल्या होत्या. विवाहितेचा पती आणि दिर हे दुपारी घरी नसतांना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती पोलीस पाटील अश्विनी बच्छाव यांनी देवळा पोलिसांना दिली. रवळजी येथील माहेर असलेल्या कोमलला दीड वर्षांची एक मुलगी आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास देवळा पोलीस करत आहेत.

Intro:आज दुपारच्या सुमारास देवळा तालुक्यातील सावकी येथील कोमल अतुल देवरे वय (२१) या विवाहितेने घरगुती कारणातून गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. Body:पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सावकी येथील दिलीप देवरे यांचे  ठेंगोडा रोडवरील घरी त्यांच्या सून कोमल अतुल देवरे  हिने दुपारच्या सुमारास घराच्या छतास दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोमलचे सासरे  एनडीसीसी बँकेचे कर्मचारी दिलीप देवरे  हे कामावर गेले होते तर त्यांची पत्नी या काही दिवसांपासून माहेरी गेल्या आहेत. विवाहितेचा पती व दिर हे दुपारी घरी नसतांना तिने गळफास घेऊन  आत्महत्या केलीConclusion:घटनेची खबर पोलीस पाटील अश्विनी बच्छाव यांनी देवळा पोलिसात दिली. रवळजी येथील माहेर असलेल्या कोमलला दीड वर्षांची एक मुलगी आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनासाठी प्रेत देवळा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास देवळा पोलीस करत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.