नाशिक माता गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे,स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते,अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. साडी, चोळी,दागिने, इत्यादी गोष्टींनी तिचा संपूर्ण श्रृंगार केल्या जातो. यंदाच्या गौरींच्या सजावटी करीता खडे आणि सोनेरी मुलाम्याचे दागिणे सर्वाधिक वापरले जात आहे. Markets bloomed with ornaments. Crowd of women in Nashik bazaar.
जुन्या धाटणीच्या दागिन्यांना पसंती फक्त मोत्याच्या दागिन्यांपेक्षा खडे आणि सोनेरी मुलाम्याच्या दागिन्यांना बाजारामध्ये विशेष मागणी आहे. तसेच आर्टिफिशल चिंचपेटी, तन्मणी, झुमका, वेल, वेणी, बिंदी, हातातील कडे, बांगड्या, मंगळसूत्र, मीरी पिन, पायल, कमरपट्टा, नथ, बुगडी, ठुशी, कमळ, टिकली, जोडवे असे दागिणे ऑक्साईड मोती आणि गोल्डन या प्रकारात उपलब्ध आहे. गौरीच्या दागिन्यांमध्ये एकदानी, ठुशी, पुतळ्या, कोल्हापुरी साज यांमध्ये थोडेसे नावीन्य आणून बाजारामध्ये विक्रीस आलेले आहेत. मात्र जुन्या धाटणीच्या दागिन्यांनाच लोक पसंती देत आहेत. बाजूबंद, नथ, कमरपट्टा, मुकुट आदी दागिन्यांमध्ये खड्यांचे आणि हिऱ्यांच्या दागिन्यांकडे ग्राहकांचा कल आहे.
श्रीविष्णूने श्रीअलक्ष्मीला दिले तीन वर मी समुद्र मंथन या लेखात सांगितल्या प्रमाणे मंथनातून श्रीमहालक्ष्मी आणि त्याची बहीण श्रीअलक्ष्मीचा जन्म झाला श्रीमहालक्ष्मी म्हणजे आणि श्रीअलक्ष्मी असे म्हणतात. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहिण 'अलक्ष्मी' ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्रीविष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठा भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला.
दोघी बहिणींची पूजा पण श्रीअल्क्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्र्वत्थ (पिंपळाचे झाड) वृक्षा खाली रडत बसली. तिथुन श्रीविष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते.