ETV Bharat / state

माणुसकीचा झरा : मनमाड गुरुद्वारामार्फत 5000 गरजुंना जेवणाची व्यवस्था... - food for needful

लॉकडाऊन झाले त्या दिवसापासून दररोज मनमाड शहरासह नाशिक श्रीरामपुर या ठिकाणच्या जवळपास 5 हजार गरजू नागरिकांची मनमाड गुरुद्वारा भूक भागवत आहे. भविष्यात कितीही दिवस लागले तरी, आम्ही जेवण पुरवू असे गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंग यांनी सांगितले आहे.

मनमाड गुरुद्वारा भागवतय 5000 गरजूंची भूक

author img

By

Published : Apr 21, 2020, 12:04 PM IST

Updated : Apr 21, 2020, 12:25 PM IST

नाशिक - 'कारसेवा' हे ब्रीदवाक्य बरेच काही सांगून जाते मात्र, या ब्रीदवाक्याचा खरा अर्थ आता अडचणीत असलेल्या नागरिकांना कळाला आहे. लॉकडाऊन झाले त्या दिवसापासून दररोज मनमाड शहरासह नाशिक श्रीरामपुर या ठिकाणच्या जवळपास 5 हजार गरजू नागरिकांची मनमाड गुरुद्वारा भूक भागवत आहे. भविष्यात कितीही दिवस लागले तरी, आम्ही जेवण पुरवू असे गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंग यांनी सांगितले आहे.

मनमाड गुरुद्वारा भागवतय 5000 गरजूंची भूक

भारतातील क्रमांक तीनचा गुरुद्वारा मनमाड शहरात आहे. या ठिकाणी देशविदेशातील भाविक कायम दर्शनासाठी येत असतात. असेही येथील गरजू बेवारस असणाऱ्यांना गुरुद्वाराकडून रोज अन्न दिले जात होते. मात्र, लॉकडाऊन झाले तसे गोरगरीब व हातमजुर यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला. यावेळी बाबा रणजितसिंग यांनी स्थानिक प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने सर्व गरजू लोकांना रोज दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. आज लॉकडाऊन सुरू झाले त्या दिवसापासून मनमाडला सर्व गरजू आणि गोरगरिबांना घरपोच रोज अन्न मिळते आहे. एवढेच नव्हे तर रोज रस्त्यावर जाणाऱ्या वाहनचालकांनादेखील त्यांच्यातर्फे अन्न पुरविण्यात येत आहे.

मनमाड शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते व पालिका प्रशासनाने रस्त्याने पायी आपल्या घरी जाणाऱ्या मजूर कामगारांना देखील जेवणाची व्यवस्था गुरुद्वारामार्फत केली आहे. रोज यामार्गे जाणाऱ्यांनादेखील पोटभर जेवण देऊनच पुढे पाठवत आहेत. तर, मनमाड शहरासह नाशिक आणि श्रीरामपूर या ठिकाणी देखील रोज गरजू लोकांना अन्नाचे पाकिट पाठवले जात आहे. लॉकडाऊनच्या या कठीण काळात गुरुद्वारामुळे दररोज जवळपास 5 हजार गरजुंना दोन वेळेचे जेवण मिळत आहे.

Last Updated : Apr 21, 2020, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.