ETV Bharat / state

धक्कादायक! 'मला कोरोना झालाय, उपचाराची भीती वाटते'; चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या - corona virus batmi

कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना बाबतच्या बातम्या वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, सोशल मीडियावर वारंवार दाखवल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातूनच अनेकांना मानसिक आजार देखील जडत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

man-committed-suicide-due-to-corona-suspect-in-nashik

author img

By

Published : Apr 12, 2020, 9:56 AM IST

नाशिक- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. दिवसागणीक देशाच्या कानाकोपऱ्यातून नवे रुग्ण समोर येत आहेत. तर कोरोनाशी झुंज देत अनेकांचा मृत्यूही होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाबाबत भीतीचे वातावरण आहे. अशातच नाशिकमध्ये येथील एका 31 वर्षीय तरुणाने कोरोनाच्या भीतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

man-committed-suicide-due-to-corona-suspect-in-nashik
प्रतीक कुमावत

हेही वाचा- 'संचारबंदी नसती तर भारतात 2 लाख कोरोनाग्रस्त असते'

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील चेहडी पम्पिंग स्टेशन जवळ राहणार प्रतीक कुमावत (वय 31 व्यवसायाने प्लंबर) याला घशाचा त्रास जाणवत होता. कोरोना झाल्याचा संशय प्रतीकच्या मनात बळावला. कोरोना झाल्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराबद्दल त्याच्या मनात भीती होती. या भीतपोटी त्याने शनिवारी रात्री 11 वाजता घरात आत्महत्या केली.

आत्महत्येपुर्वी प्रतीकने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, 'घशाला त्रास होत असल्याने मी त्रस्त झालो असून, मी आत्महत्या करत आहे. मला कोरोनाची लक्षण असून मला उपचाराची भीती वाटते. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे.' त्याने ती चिठ्ठी दरवाज्याला चिटकवली आणि आत्महत्या केली.

सकाळी दरवाजा उघडला नाही म्हणून पाहायला गेलेल्या वडिलांना दरवाज्यावर लावलेली चिठ्ठी दिसली. घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी कोरोना विभागाच्या पथकाला पाचारण केले. त्यांच्या घशातील नमुने घेतल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. याबाबत नाशिकरोड पोलrस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

दरम्यान, कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना बाबतच्या बातम्या वृत्तपत्र, वृत्तवाहिनी, सोशल मीडियावर वारंवार दाखवल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातूनच अनेकांना मानसिक आजार देखील जडत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, कोरोना बाधित अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. उपचारानंतर ते घरी परत गेले आहेत. त्यामुळे कोरोना म्हणजे मृत्यू असे समजण्याचे काहीच कारण नाही. नागरिकांनी घाबरुन जावू नये. मात्र, खबरदारी, काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.