ETV Bharat / state

मालेगाव तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सर्व्हेक्षणासाठी 400 पथके - जिल्हाधिकारी सूरज मांढरे

वैद्यकीय तज्ज्ञ, शिक्षक व शासकीय कर्मचारी प्रत्येकी एक अशा तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक, याप्रमाणे 400 पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण करणार आहेत. ज्यांना कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येतील त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

मालेगाव कोरोना अपडेट
मालेगाव कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 10, 2020, 10:22 AM IST

नाशिक - कोरोना या जीवघेण्या विषाणूचा मालेगावातही संसर्ग झाला असून एकाच वेळी पाच रुग्ण आढळले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी 400 पथके तयार करून संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे

शासकीय विश्रामगृह मालेगाव येथे सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, उपमहापौर निलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांच्यासह प्रशासनातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

वैद्यकीय तज्ज्ञ, शिक्षक व शासकीय कर्मचारी प्रत्येकी एक अशा तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक, याप्रमाणे 400 पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण करणार आहेत. ज्यांना कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून येतील त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनीही या सर्व पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले आहे. तसेच, येणारे आठ दिवस अतिमहत्वाचे आहेत, म्हणून प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

मालेगावमधील प्रकार सामूहिक संसर्गाचा असल्याचे प्रथमदर्शनी भासत आहे, असे मांढरे म्हणाले. 'प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना प्रभावीपणे व कडक स्वरुपात आता यापुढे राबविण्यात येणार आहेत. संपूर्ण तालुक्यातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंट्रोल रुमची तत्काळ स्थापना करावी. स्वस्त धान्य दुकानात नागरिकांची गर्दी होऊ नये. म्हणून धान्य वितरणाचे सुयोग्य नियोजन करावे. भाजीपाला वितरणासाठी मोजक्या हातगाड्यांना परवाने देऊन घरपोच भाजीपाला पोहचवावा. मदतीसाठी पुढे येणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची यादी तयार करून मिळणारी सर्व मदत एका छताखाली आणून प्रशासनामार्फत गरजू पर्यंत पोहचविण्याचे सूक्ष्म नियोजन करावे,' अशा सूचनाही मांढरे यांनी दिल्या.

मालेगावातील पाचही कोरोनाबाधितांचा निवासी परिसर सीलबंद करण्यात आला आहे. त्यांना झालेल्या संसर्गाची माहिती मिळविण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे. या पाचही कोरोनाबाधित रुग्णांना कुठलीही प्रवाशी पार्श्वभूमी दिसून येत नसल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यासाठी कोम्बिंग ऑपरेशनही राबविण्यात येणार आहे. या पाच रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. उर्वरित चारही बाधित रुग्णांमुळे अधिक रुग्ण बाधित होतील ही शक्यता लक्षात घेवून एक खाजगी रुग्णालय पूर्णपणे क्वारन्टाईन हॉस्पीटल म्हणून अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्याठिकाणी या चारही बाधित रुग्णांना पुढील उपचारासाठी स्थलांतरित करण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून कुणीही घराबाहेर पडू नये, यासाठी संचारबंदीची मुदत वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिबंधात्मक आदेश न पाळणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे निर्देश.........

यावेळी राज्याचे कृषी मंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या दारापर्यंत रेशन, भाजीपाला, आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना तयार करण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तर धान्य वितरण व्यवस्थेमध्ये कुचराई, साठेबाजी करणाऱ्यांसह प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी यावेळी दिले. तसेच आपत्ती काळात मदतीसाठी सेवाभावी संस्थांनी पुढे येवून मदतीचे आवाहनही त्यांनी केले.

यानंतर मंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह डॉक्टर व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सामान्य रुग्णालयास भेट दिली. 'आपण केवळ सेवा बजावत नसून आपली ही खरी देशभक्ती आहे,' असे जिल्हाधिकारी मांढरे सर्व डॉक्टर व नर्सिंग स्टाफशी बोलताना म्हणाले. यामुळे त्यांचे मनोबल निश्चितपणे वाढणार आहे. मंत्री भुसे यांनी आरोग्य प्रशासनाचा आढावा घेतला. शहराबाहेर असलेल्या जीवन हॉस्पिटलची पाहणी करत तेथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची देखील त्यांनी माहिती जाणून घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.