ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा बोलबाला

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालात महाविकास आघाडीला 387 जागा मिळाल्या असून भाजपला 109 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत 4 हजार 299 जागांसाठी एकूण 11 हजार 56 उमेदवारांनी आपलं नशीब अजमावले होते.

author img

By

Published : Jan 18, 2021, 5:46 PM IST

election result
election result

नाशिक - जिल्ह्यातील 565 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी पूर्ण होऊन यात महाविकास आघाडीचा बोलबाला राहिला आहे. यात महाविकास आघाडीला 387 जागा मिळाल्या असून भाजपला 109 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत 4 हजार 299 जागांसाठी एकूण 11 हजार 56 उमेदवारांनी आपलं नशीब अजमावले होते.

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचा बोलबाला

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली होती. कोरोना काळातसुद्धा मतदारांमध्ये उत्साह दिसून आल्याने जिल्ह्यात सरासरी 80 टक्के मतदान झाले होतें. आज नाशिक जिल्ह्यातील 13 ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यंदा 565 ग्रामपंचायत निवडणुकीत 4 हजार 299 जागांसाठी एकूण 11 हजार 56 उमेदवारांनी आपलं नशीब अजमावले होते. यात महाविकास आघाडीचा बोलबाला राहिला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला लक्षणीय यश मिळाले असून, महाविकास आघाडीला 387 जागा मिळाल्या. तर भाजपला 109 जागांवर समाधान मानावे लागले

55 ग्रामपंचायत बिनविरोध

नाशिक जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. मात्र, 55 ग्रामपंचायतीच्या 1327 जागा आधीच बिनविरोध निवडून आल्याने प्रत्यक्षात 565 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. यात 387 जागा मिळवत महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले.

पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी 164 + 11 = 175

काँग्रेस 50 + 5 = 55

शिवसेना 143 + 14 = 157

भाजप 109 + 7 = 116

माकप 8

इतर 98 + 11 = 109

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.