ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: आमदार सरोज अहिरे कोणाच्या सोबत? खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ मंत्री भुजबळांनी घेतली भेट

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षात तळ्यातमळ्यात असलेल्या आमदारांचा भाव प्रचंड वधारला आहे. त्यापैकी देवळाली मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे आहेत. शनिवारी रात्री राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. त्या पाठोपाठ रविवारी मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली. दोन्ही गटाच्या बाजुंनी त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Maharashtra Political Crisis
सुप्रिया सुळे व छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 10, 2023, 7:28 AM IST

सुप्रिया सुळे व छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सध्या दोन्ही गटांकडून आमदारांना आपापल्याकडे खेचण्याचे काम सुरू आहे. देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर नाशिक शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तेव्हा त्यांची शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे व अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांनी भेट घेतली आहे.

सुप्रिया सुळेंनी घेतली भेट : सरोज ताई माझी बहीण आहेत. कुटुंबातील व्यक्ती दवाखान्यात असल्याने मी बाळाला आणि ताईला भेटायला आले. राजकारणात अशी आव्हाने येत असतात. मी शारदाबाई पवारांची नात आहे. इतके संवेदनशील होऊ नये. मी प्रायव्हसी आणि हॉस्पिटलचा विचार करून बोलेल. मी राजकारणाबद्दल एक शब्द बोलले नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यानी सांगितले आहे. मागील आठवड्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत तीस ते पस्तीस आमदार फोडले. त्यांनी मंत्रालयात पोहोचत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी पक्षावर दावा ठोकत काका तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिले. पक्ष म्हणून मान्यतेसाठी त्यांना चाळीस आमदारांची गरज आहे. तर खासदार शरद पवार यांच्याकडे बोटावर मोजण्याइतके आमदार उरले आहेत.

सत्तासंघर्ष लढाई : राष्ट्रवादीतील सत्तासंघर्षाच्या लढाईत एकेक आमदार महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही बाजुंनी आमदारांना आपल्या तंबूत वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे या कोणत्या गटात जायचे यावरून प्रचंड तणावात आहे. त्या रुग्णालयात उपचार घेत आहे. नाशिक दौर्‍यावर आलेल्या सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या खासदार शरद पवार यांच्या गटात सहभागी होण्यासाठी प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर दुसर्‍या दिवशी छगन भुजबळ य‍ांनी आमदार अहिरे य‍ांची भेट घेतली. एकूणच कोणत्या गटात जायचे याची निवड करणे त्यांच्यासाठी कसोटी ठरणार आहे. दादा की काका? आमदार अहिरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

छगन भुजबळ यांनी घेतली भेट : रविवारी मंत्री छगन भुजबळ यांनी अहिरे यांची रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. भुजबळ यांनी संजीवनी रुग्णालयाचे डॉ.अमेय कुलकर्णी, डॉ.मधुर केळकर कुलकर्णी यांच्याशी आमदार सरोज आहिरे यांच्यावर सुरू असलेल्या उपाचाराबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच आवश्यकता असल्यास मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून अधिक तपासण्या करून आवश्यकतेनुसार मुंबईला उपचार घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

  1. Ministry Expansion : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासह खाते वाटप होणार आठवडाभरात, काही विद्यमान मंत्र्यांना मिळणार डच्चू ?
  2. Uddhav Thackeray On CAA : एक देश, एक कायदा' मान्य मात्र, एक देश एक पक्ष' मान्य नाही - उद्धव ठाकरे
  3. Thackeray Vs Rana : उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच राणा दाम्पत्याचे हनुमान चालिसा पठण, उबाठा आणि राणा समर्थकांनी एकमेकांचे पोस्टर फाडले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.