नाशिक - शहर पोलिसांनी संचारबंदीच्या काळात आणखी एक कठोर पाऊल उचलले आहे. संचारबंदीच्या काळात रस्त्यावर मजा लुटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर थेट वाहनजप्तीचीच कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी तब्बल १३९ वाहने जप्त केली आहेत.
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कर्फ्यू नियमांमधून सवलत मिळवून मजा लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही तरुणांना नाशिक पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला. रक्तपेढीच्या नावाखाली मोकळ्या रस्त्यावर पर्यटन करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी कायद्याचा प्रसाद दिला. नाशिक शहरातील पोलिसांनी हे कडक धोरण आखले आहे. विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर दिसल्यास नाशिककरांना पुढील तीन महिने वाहनाला मुकावे लागणार आहे.