ETV Bharat / state

नाशिक; अखेर.. अपहरण झालेली चिमुकली सापडली! - नाशिक जिल्हा रुग्णालय

सुदैवाची बाब म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे काही दिवसांपूर्वीच कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामुळे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान या सीसीटीव्हीच्या आधारावरच चिमूकलीचे अपहरण करणाऱ्या भामट्याचा पोलिसांनी शोध घेतला आहे.

नाशिक जिल्हा रुग्णालयातून अपहरण झालेली चिमुकली सापडली

author img

By

Published : Feb 16, 2021, 2:55 PM IST

नाशिक - जिल्हा रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी अपहरण केलेली दीड वर्षाची मुलगी अखेर सापडली. या दीड वर्षाच्या मुलीला नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या परिसरात सोडून देत अपहरण करता फरार झाला होता. परंतू अपहरणकर्त्याचा शोध घेत सरकारवाडा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आपल्या नातलगांना भेटण्यासाठी आईसोबत आलेल्या चिमुकलीचे नाशिकचा जिल्हा रुग्णालयातून अज्ञात इसमाने अपहरण झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या चिमुकलीच्या अपहरणाचा सर्व प्रकार रुग्णालयातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता.

नाशिक जिल्हा रुग्णालयातून अपहरण झालेली चिमुकली सापडली
नाशिक जिल्हा रुग्णालयातून अपहरण झालेली चिमुकली सापडली

सीसीटीव्हीच्या फुटेजवरून अपहरणकर्त्याचा शोध
शनिवारी सकाळच्या सुमारास अपहरण झालेल्या मुलीचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होण्यासाठी आले होते. मात्र, रुग्णालयातील ढिसाळ कारभारामुळे ऍडमिट होण्यासाठी सकाळची दुपार झाली आणि दुर्दैवाने ही घटना घडली. जिल्हा रुग्णालयाने वेळीच उपचारासाठी दाखल करून घेतले असते, तर ही घटना घडली नसती, असा आरोप अपहरण झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी केला होता. सुदैवाची बाब म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे काही दिवसांपूर्वीच कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामुळे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान या सीसीटीव्हीच्या आधारावरच चिमूकलीचे अपहरण करणाऱ्या भामट्याचा पोलिसांनी शोध घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.