नाशिक - येवला तालुक्यातील देवळाने गावातील आनंदा राजाराम काळे यांच्या ऊसाच्या शेतात मादी जातीचा बिबट आढळला आहे. त्यामुळे, संपूर्ण भागात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - वस्त्र मंत्रालयाच्या पुढाकाराने येवल्यात पैठणी विणकामाचे महिलांना मोफत प्रशिक्षण
बिबट्यामुळे ग्रामस्थ भयभीत
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील देवळाने - खामगाव मार्गावर राहात असलेले आनंदा राजाराम काळे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये बिबट दिसला. या बिबट्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वनाधिकारी बशीर शेख यांनी सांगितले आहे. दरम्यान, रात्री शेतात पिकांना पाणी द्यावे लागते. मात्र, बिबट्या आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने उसाच्या शेतामध्ये पिंजरा लावला आहे.
हेही वाचा - विना मास्क फिरणाऱ्यांवर नाशिक मनपाची कारवाई; सव्वा दोन लाखांचा दंड वसूल