नाशिक - शहरातील भरवस्तीत मध्यरात्री बिबट्याचा वावर दिसून आला आहे. पेठरोडलगत असलेल्या नामको चॅरिटेबल ट्रस्ट सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालयाजवळ बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये भातीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, रुग्णालयाचा दरवाजा बंद असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला आहे.
भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाणे परिसरातून बिबट्याला ताब्यात घावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, उन्हाळा असल्याने वन्यजीव पाण्याच्या व अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.