ETV Bharat / state

चाडेगाव शिवारात बिबट्या जेरबंद, अनेक दिवसांपासून माजवली होती दहशत - chadegaon area

चाडेगाव शिवारात निशांत वाघ यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला असून बिबट्याने अनेक दिवसांपासून या भागात दहशत माजवली होती.

बिबट्या जेरबंद
author img

By

Published : Jul 10, 2019, 3:24 PM IST

Updated : Jul 10, 2019, 3:31 PM IST

नाशिक - तालुक्यातील चाडेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. मात्र, वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्या जेरबंद झाला. यामुळे आता परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

चाडेगाव शिवारात निशांत वाघ यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. आज पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला असून बिबट्याने अनेक दिवसांपासून दहशत माजवली होती. बिबट्याने गाववस्तीत अनेकदा शेळ्या व गुरांवर हल्ले केले होते.

बिबट्या जेरबंद

नाशिक जिल्ह्यातील सटाणा, सिन्नर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांनी दहशत माजवली आहे. बिबट्यांनी गाववस्तीत येत जनावरांचा फडशा पाडला आहे. तर काही शेतकऱ्यांवरही हल्ले चढवले आहेत. यातील काही बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. शिंदगावातील बिबट्याला दहा दिवसानंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. तर सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारातही वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला होता. बिबट्यांच्या या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Intro:नाशिक तालुक्यातील चाडेगाव परिसरात गेल्या अनेक  दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते मात्र वन विभागाने
लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्या जेरबंद झाला यामुळे आता परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलायBody: चाडेगाव शिवारात निशांत वाघ यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता आज पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला असुन ह्या बिबट्याने अनेक दिवसापासून दहशत माजवली होती. बिबट्यांनी गाववस्तीत
अनेकदा शेळ्यां व गुरांवर हल्ले केले होते या संपूर्ण प्रकारामुळे चाडेगाव या परिसरातले नागरिक भीतीच्या वातावरण राहत होते मात्र अखेर बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाConclusion:नाशिक जिल्ह्यातील सटाणा, सिन्नर तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्यांनी दहशत माजवली आहे. बिबट्यांनी गाववस्तीत येत जनावरांचा फडशा पाडला आहे. तर काही शेतकऱ्यांवरही हल्ले चढवले आहेत. यातील काही बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. शिंदगावातील बिबट्याला दहा दिवसानंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. तर सिन्नर तालुक्यातील चापडगाव शिवारातही वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला होता. बिबट्यांच्या या वाढत्या हल्ल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे
Last Updated : Jul 10, 2019, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.